मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : एप्रिल महिन्याचा पहिलाच दिवस या ५ राशींना आर्थिक वृद्धीचा, उत्तम प्रसिद्धीचे योग

Today lucky zodiac signs : एप्रिल महिन्याचा पहिलाच दिवस या ५ राशींना आर्थिक वृद्धीचा, उत्तम प्रसिद्धीचे योग

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 01, 2024 12:48 PM IST

Lucky Rashi Today 1 April 2024 : आज १ एप्रिल २०२४ सोमवार रोजी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात या ५ राशींना दिवस आर्थिक वृद्धीचा. वाचा या कोणत्या राशी आहेत ज्यांचे नशीब चमकेल.

नशीबवान राशी १ एप्रिल २०२४
नशीबवान राशी १ एप्रिल २०२४

आज सोमवार १ एप्रिल रोजी, चंद्र धनु राशीत प्रवेश करेल. तसेच आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून, या दिवशी वरियान योग, रवि योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.

मेष: 

आज समाजात मान मिळेल. लांबचे प्रवास आनंददायक होतील. प्रसिद्धीही मिळेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल.

सिंह: 

आज बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा, निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील.

वृश्चिक: 

आज उत्साही आणि आनंदी असाल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. 

मकर: 

आजचं दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. आर्थिक घडी बसेल. कलाकरांना संधी मिळतील. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. 

कुंभ: 

आज उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होईल. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामाची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. 

WhatsApp channel