Lucky Rashi Bhavishya 04 November 2024 : आजचा हा दिवस कार्तिक शुक्ल तृतीया तिथी आहे. या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत असेल. ४ राशीच्या लोकांसाठी सोमवार, ४ नोव्हेंबर हा दिवस अतिशय शुभ राहील. त्यांच्या जीवनात आनंद येईल. आर्थिक लाभासोबतच त्यांना इतर अनेक फायदेही मिळू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा आज मोठा फायदा होईल. ४ नोव्हेंबर २०२४ च्या या ४ भाग्यशाली राशी आहेत - मिथुन, सिंह, धनु आणि मीन.
मिथुन राशीच्या जातकांना सोमवार, ०४ नोव्हेंबर रोजी व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजच्या तिथीला तुमची नोकरीची स्थितीही चांगली राहील. या राशीचे जातक नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकतात. तुमच्या आईकडून तुम्हाला एखादी महागडी भेट मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाल. आज तुमचे आरोग्यही चांगले राहील.
या राशीच्या जातकांना एखादी गुड न्यूज मिळू शकते. या बातमीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. न्यायालयीन खटले निकाली निघाल्यानंतर तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. कुटुंबात एखादी शुभ घटना घडू शकते. आधी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. दिवस शांततेत जाईल.
या राशीच्या बेरोजगार जातकांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळू शकते. तुमचे जुने वाद संपतील. तुमच्या मुलांमुळे तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शहाणपणाने घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. तुम्ही जुगार आणि सट्टेबाजीतून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता.
सोमवार, दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी मीन राशीचे जातक खूप आनंदी राहतील. तुम्हाला शेअर बाजारातून लाभ होईल. नोकरीत अधिकारी त्यांच्या कामावर खुश राहतील. एखादी मोठी दुर्घटना टाळता येईल. तुम्हाला अनुभवी लोकांचे सहकार्य मिळणार आहे. यामुळे तुम्ही नवीन व्यवसाय योजना बनवू शकता. कुटुंबासोबत कुठेतरी फिरता येईल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.