आज शनिवार, ०२ नोव्हेबर २०२४, अर्थात कार्तिक मासाची शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. या दिवशी गोवर्धन पूजा आणि अन्नकूट महोत्सव देखील साजरा केला जात आहे. हा दिवस वृषभ, सिंह, वृश्चिक, मकर आणि मीन या ५ राशींच्या जातकांसाठी चांगला जाणार आहे.
वृषभ राशीच्या जातकांना आज शनिवार, ०२ नोव्हेंबर या दिवशी धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी देखील ऐकायला मिळणार आहे. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात मोठी डील होऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज तुमच्या कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवाल.
सिंह राशीच्या जातकांना आज त्यांचे नशीब साथ देणार आहे. तुमच्या कुटुंबात एखादे शुभकार्य होऊ शकते. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीची प्रकरणं सुटू शकतात. याचा भविष्यात फायदा होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना मनाप्रमाणे पद मिळू शकते.
वृश्चिक राशीचे जातक आज नवे काम सुरू करण्याची शक्यता आहे. अनुभवी लोकांच्या सल्ल्यामुळे फायदा संभवतो. व्यर्थ कामांपासून मुक्ती मिळेल. नोकरी किंवा व्यवसायाच्या स्थितीत पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा होईल. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे आनंद होईल. पती-पत्नी रोमँटिक प्रवासाला जाऊ शकतात.
मकर राशीच्या जातकांना इच्छित नोकरी मिळू शकते. व्यवसायातही लक्षणीय सुधारणा होईल. शहाणपणाने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. महिलांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून काही चांगली बातमी कळेल. जुने वाद परस्पर संमतीने सोडवता येतील.
मीन राशीचे जातक आज योग्य निर्णय घेतील. जुन्या मित्राला भेटून आनंद होईल. अनुभवी लोकांच्या सहकार्याने तुम्ही नवीन व्यवसाय योजना बनवू शकता. पती-पत्नीमध्ये सामंजस्य राहील. नोकरीत अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील. आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.