Lucky Rashi Bhavishya 01 November 2024 : लक्ष्मीपूजनाचा आजचा दिवस कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येची तिथी आहे. आज स्वाती नक्षत्राचा योग आहे.चंद्र आज तूळ राशीत संचार करत आहे. आजचा हा अमावस्येचा दिवस मेष, कर्क, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. या दिवशी त्यांना आर्थिक लाभासोबतच इतर अनेक लाभ मिळणार आहेत.
कार्तिक महिन्याच्या अमावस्येचा आजचा दिवस हा स्नान, दान आणि श्राद्धासाठी सर्वोत्तम राहील. असा हा दिवस ४ राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. त्या ४ भाग्यशाली राशी आहेत मेष, कर्क, कन्या आणि कुंभ. पाहुया, आज त्यांना काय मिळणार आहे.
या राशीच्या लोकांना शुक्रवार ०१ नोव्हेंबर रोजी भाग्याची साथ मिळेल. त्यांची प्रलंबित कामे पूर्ण होतील. या दिवशी आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी तुम्हाला आनंद देईल. कुटुंबातील सर्वजण तुमची प्रशंसा करतील. गुंतवणुकीसाठी दिवस अतिशय शुभ आहे.
या राशीच्या लोकांना या दिवशी चांगली बातमी मिळेल. व्यवसायात मोठे सौदे संभवतात. कुटुंबात सुख-शांती नांदेल आणि सर्व सदस्य प्रेमाने राहतील. अतिरिक्त आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील. आरोग्यात पूर्वीपेक्षा खूप सुधारणा होईल.
कन्या राशीच्या जातकांना आज १ नोव्हेंबर रोजी समाजात मान-सन्मान मिळेल. मित्रांसोबत पार्टीला जाता येईल. अनुभवी लोकांचा सल्ला उपयोगी पडेल. हा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. जुनी मालमत्ता विकून तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. आरोग्यही चांगले राहील.
कुंभ या राशीचे जाकत आज कोणत्याही तणावापासून मुक्त होतील. या जातकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतूनही त्यांना आज लाभ होईल. राजकारणाशी संबंधित लोकांची प्रगती होईल. त्यांना व्यर्थ कामातून आराम मिळेल. एखादा जुना मित्र भेटल्याने तुम्हाला आनंद होणार आहे. आज घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.