मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : चालू आठवड्यातील बुद्धादित्य योग 'या' तीन राशींसाठी ठरणार शुभफलदायक
Lucky Zodiac Signs
Lucky Zodiac Signs

Lucky Zodiac Signs : चालू आठवड्यातील बुद्धादित्य योग 'या' तीन राशींसाठी ठरणार शुभफलदायक

24 May 2023, 12:15 ISTHT Marathi Desk

Lucky Zodiac Signs this week : चालू आठवड्यात या तीन राशींना आर्थिक लाभ संभवत आहे. पाहा कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी!

मेष : सप्ताहात भाग्यदायक घटना अनुभवास येतील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. देवदर्शनासाठी प्रवास होईल. आध्यात्मिक अनुभुती घ्याल. नोकरीत नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. कर्मस्थ चंद्रभ्रमण राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. लाभ स्थानातील ग्रहयोगामुळे नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. उद्योगात लाभ होईल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल.आपण सार्वजनिक चळवळीत आपला लौकिक सांभळण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक राजकारणी लोकांना लोकप्रियता मिळेल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान प्राप्त होईल.

ट्रेंडिंग न्यूज

चंद्रबल शुभ तारीखः २३,२४,२६.

वृश्चिक : सप्ताहात कर्तृत्व आणि पराक्रम स्थानातून सुरू होणारं चंद्रभ्रमण आपणास मोठे आर्थिक लाभ घडविणारे योग आहेत. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. सुख स्थानातील चंद्रगोचर आणि शुभ योगात वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. चंद्रबल उत्तम लाभल्याने विवाह इच्छुकांचे खात्रीशीर विवाहाचे योग आहेत. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. सुख मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातून धनप्राप्ती होईल. स्पर्धापरीक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नवीन आरंभ कराल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल.

चंद्रबल शुभ तारीखः २२,२४,२५

कुंभ : सप्ताहात व्यक्तिमत्त्व स्थानातील चंद्रगोचर पाहता समाधान लाभेल. आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील कामाचे कौतुक होईल. भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. आरोग्य उत्तम राहील. चंद्रगोचर शुभ योग आहे. लॉटरीमध्ये फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. आंनदायक वातावरण राहिल. आपले आरोग्य मानसिक समाधान उत्तम राहणार आहे.

चंद्रबल शुभ तारीखः २४,२६, २६, २८.

 

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)