आज मंगळवार ९ एप्रिल रोजी, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे आणि हा दिवस हिंदू नववर्ष विक्रम संवत २०८१ आणि चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आहे. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुक्र उच्च राशीत असताना लक्ष्मी नारायण योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचाही शुभ संयोग तयार होत आहे, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशात नववर्षाचा पहिला दिवस कोणत्या ५ राशींसाठी भरभराटीचा ठरेल, जाणून घ्या.
आज आर्थिक आघाडी वर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. आर्थिक तरतूद होणार आहे. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढेल. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील.
आज शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल.
आज नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल. वाहन व घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल.
आज फायदे मिळवाल. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमत्ताचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील.
आज भाग्याची साथ चांगली मिळेल. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. कामानिमित्त प्रवास घडेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. कुटुंबात शुभवार्ता मिळेल.