मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs : भाग्यकारक घटना घडतील, या ५ राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणात यश येईल

lucky zodiac signs : भाग्यकारक घटना घडतील, या ५ राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणात यश येईल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 30, 2024 02:20 PM IST

Lucky Rashi Bhavishya 30 April 2024 : आज ३० एप्रिल २०२४ मंगळवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात काही राशींना लाभ होईल. कोण-कोणत्या राशीचे लोकं नशीबवान आहे जाणून घ्या.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ३० एप्रिल २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ३० एप्रिल २०२४

आज मंगळवार ३० एप्रिल रोजी, धनु राशीनंतर चंद्र मकर राशीत जाणार आहे. तसेच चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी साध्ययोग, त्रिपुष्कर योग, रवियोग आणि उत्तराषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशीच्या लोकांना आजचा दिवस फायदेशीर राहील.

कर्कः 

आज आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढतीचे व पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. उधारी वसुल होईल. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास लाभदायक ठरेल.

सिंह: 

आज वडिलधाऱ्या व्यक्ती कडून आर्थिक लाभ होईल. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. मानसन्मान प्रतिष्ठा मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील. आकस्मिक धनलाभ होईल.

कन्या: 

आज भाग्यकारक घटना घडतील. आर्थिक स्थिती उत्तम होईल. भावशाली व्यक्तीच्या संपर्कात येण्याची संधी मिळेल. कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळणार आहे. व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल.

वृश्चिकः 

आज सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. संतती कडून चांगली बातमी मिळेल. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल.

धनु: 

आज सौभाग्य योगात वृद्धी होईल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. युवकांना नविन संधी मिळणार आहे. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. राहीलेली कामे पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापार विस्तार यशस्वी होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. विवाह जुळतील. भावंडाची योग्य साथ मिळेल.

WhatsApp channel