मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs : स्पर्धा-परिक्षेत यश मिळेल, या ५ राशीच्या लोकांना होईल आकस्मिक धनलाभ

lucky zodiac signs : स्पर्धा-परिक्षेत यश मिळेल, या ५ राशीच्या लोकांना होईल आकस्मिक धनलाभ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 29, 2024 03:09 PM IST

Lucky Rashi Bhavishya 29 April 2024 : आज २९ एप्रिल २०२४ सोमवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात काही राशींना लाभ होईल. कोण-कोणत्या राशीचे लोकं नशीबवान आहे जाणून घ्या.

नशीबवान राशी २९ एप्रिल २०२४
नशीबवान राशी २९ एप्रिल २०२४

आज सोमवार २९ एप्रिल रोजी, चंद्राचे गुरूच्या धनु राशीत भ्रमण होणार आहे. याशिवाय आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी सिद्ध योग, रवियोग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.

मेष: 

आज नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे. आकस्मिक लाभ होतील. मनस्वास्थ उत्तम राहील. कामे सहजगत्या होतील. प्रमोशन, बढती, पदोन्नतीचे योग आहे. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. 

वृषभ: 

आज मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. संततीकडून समाधान लाभेल. 

कर्क: 

आज कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्त्रोत वाढेल. वैवाहीक जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर, वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील.

कन्या: 

आज आर्थिक लाभ होईल. उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. यश निश्चित लाभेल. सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. मान-सन्मान वाढेल.

तूळ: 

आज उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कर्ज मंजूर होईल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. अपूर्ण काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारी यशस्वी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळेल व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

WhatsApp channel