मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs 28 March 2023 : परदेश प्रवासाचे योग, अडकलेले पैसे परत मिळतील
आजच्या नशीबवान राशी
आजच्या नशीबवान राशी (हिंदुस्तान टाइम्स)

Lucky Zodiac Signs 28 March 2023 : परदेश प्रवासाचे योग, अडकलेले पैसे परत मिळतील

28 March 2023, 6:45 ISTDilip Ramchandra Vaze

Today Lucky Zodiacs : अमुक एका राशीची व्यक्ती कशी असेल याचा अंदाज जसा त्या व्यक्तीच्या राशीवरुन मांडला जाऊ शकतो, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीसाठी आजचा दिवस कसा असेल हे त्या व्यक्तीच्या राशीवरुन आपल्याला समजतं.

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आपल्याला त्या व्यक्तीच्या राशीनुसार समजतो. अमुक एका राशीची व्यक्ती कशी असेल याचा अंदाज जसा त्या व्यक्तीच्या राशीवरुन मांडला जाऊ शकतो, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीसाठी आजचा दिवस कसा असेल हे त्या व्यक्तीच्या राशीवरुन आपल्याला समजतं. आज कोणत्या राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी अनुकूल दिनमान आहे हेही आपल्याला रोजच्या राशीभविष्यावरुन समजतं. अशाच काही आजच्या नशीबवान राशी, ज्यांच्यासाठी आज दिवस उत्तम असणार आहे त्याचं राशीभविष्य पाहूया.

ट्रेंडिंग न्यूज

आजच्या नशीबवान राशी २८ मार्च २०२३ 

वृषभ रास

साहसी निर्णय घेण्याचा आजचा दिवस आहे. मान सन्मान वाढेल. नव्या कल्पना सुचतील आणि त्या अमलात आणाल. कुटुंबासोबत आज चांगला वेळ घालवाल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिवस आहे.बांधकाम क्षेत्रात असाल तर आजचं दिनमान अनुकूल आहे. आखलेल्या योजना पूर्ण होतील. घरात काही शुभवार्ता ऐकायला मिळेल. शासकीय योजना अमलात येतील. 

शुभरंग: सफेद

सिंह रास

अडकलेला पैसा परत मिळाल्याने आनंद होईल. जोडीदाराच्या इच्छा पूर्ण कराल, त्यामुळे एक वेगळंच आनंदाचं वातावरण असेल. थोडे जास्त प्रयत्न केल्यास चांगलं यश मिळेल. व्यापारात नवे प्रस्ताव येतील. आर्थिक लाभासाठी उलाढाली सुरू राहातील. प्रेमप्रकरण यशस्वी होईल. स्वतःला सिद्ध कराल. लेखनक्षेत्रातील व्यक्तीनी नवीन प्रस्ताव योजना मिळतील. प्रगतीकारक दिनमान आहे. आज उत्तम दिनमान आहे.

शुभरंग: लाल

वृश्चिक रास

शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची प्रगती होईल. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. नोकरीत जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडाल. आज कार्य वेळेवर पूर्ण होईल.प्रवासाचे योग प्रबळ आहे. प्रवासातून लाभ होणार आहे. परदेशगमनाची संधी मिळेल. आज भाग्य साथ देईल.अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील.  प्रयत्नवादी राहाल. कामे यशस्वी होतील. व्यापारात आर्थिक लाभ चांगले होतील. कलाकारांना अनुकुलता लाभेल. मुलाची अभ्यासात प्रगती होईल.

शुभरंग: तांबडा

धनु रास 

व्यापारात नफ्याचे योग आहेत. कामानिमित्त घरापासून दूर जाण्याचे योग आहेत. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. शैक्षणिक कार्यात प्रगती संभव आहे. मन समाधानी असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आज विद्यार्थी परीक्षांमध्ये यशस्वी होतील. आर्थिक लाभ होतील. घरात उत्तम वातावरण आहे. पत्नी साथ देईल. जुने मित्र भेटतील. नोकरीत आज जबाबदारी सांभाळावी लागेल. कला क्षेत्रातल्या व्यक्तीसाठी उत्तम दिनमान आहे.

शुभरंग: पिवळा

विभाग