मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs : आनंद प्राप्त होईल, मानसिक सौख्य लाभेल; या ५ राशींसाठी प्रगतीकारक दिवस

lucky zodiac signs : आनंद प्राप्त होईल, मानसिक सौख्य लाभेल; या ५ राशींसाठी प्रगतीकारक दिवस

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 24, 2024 01:13 PM IST

Lucky Rashi Bhavishya 24 April 2024 : आज २४ एप्रिल २०२४ बुधवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात काही राशींना फायदा होतो आहे. या नशीबवान राशी कोणत्या आहे ते जाणून घ्या.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २४ एप्रिल २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २४ एप्रिल २०२४

आज बुधवार २४ एप्रिल रोजी, चंद्र शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असून, या दिवशी सिद्धी योग, व्यतिपात योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

मेषः 

आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील. मन प्रसन्न असेल. जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. मान-सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होईल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारी वर्गाला आर्थिक फायद्याचा दिवस आहे. 

कन्याः 

आज नोकरी, व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. नोकरीत बदल करायची इच्छा असणाऱ्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काचे प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल होईल. व्यापारात आर्थिक प्रगती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल.

मकरः 

आज लाभदायक दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. रेंगाळलेली कामे गती घेतील. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग राहा. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विद्यार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. आपली कामे नियोजनात्मक पद्धतीने सुरुळीत पार पाडाल. अचानक आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. 

कुंभः 

आज पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहमान आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.

मीनः 

आज आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आर्थिक कामे मनासारखी घडतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आपला छंद जोपासाल. नवनवीन कल्पना सुचतील. अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. संशोधन क्षेत्रात काम करणार्‍यांची प्रगती होईल. परिपूर्ण काम कराल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. 

WhatsApp channel