आज मंगळवार २३ एप्रिल रोजी, कन्या राशीनंतर चंद्र तूळ राशीत जाणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा असून या तारखेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात आहे. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी पवनपुत्र हनुमानाचा जन्म माता अंजनीच्या पोटातून झाला होता. हनुमान जयंतीच्या दिवशी सिद्धी योग, त्रिग्रही योग आणि चित्रा नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशींच्या लोकांना भाग्याची उत्तम साथ मिळेल, बजरंगबली सर्व संकटे दूर करतील.
आज दिवस उत्तम आहे. आर्थिक आवक चांगली राहील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत यशस्वी व्हाल. कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील.
आज पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य चांगले मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. कामात उत्साह वाढेल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील.
आज जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी, व्यवसायात अचानक फायदा होईल. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. आत्मविश्वास वाढल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहील. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमण घडेल.
आज तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाज कराल. व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
आज व्यापार रोजगार चांगला चालेल. मुलांसंबंधातील कामात प्रगती होईल. वडिलोपार्जित धंद्यामध्ये वृद्धी होईल. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. प्रियजनांची गाठभेट होईल. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ होतील. आत्मविश्वास वाढल्याने कठीण पेचप्रसंगावर सहज मात कराल.