lucky zodiac signs : लक्षणीय प्रगती होईल; या ५ राशींना खरेदी आणि शुभ कामासाठी दिवस मंगलमय ठरेल-lucky zodiac signs 22 april 2024 astrology predictions or mithun kark vrishchik dhanu meen rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs : लक्षणीय प्रगती होईल; या ५ राशींना खरेदी आणि शुभ कामासाठी दिवस मंगलमय ठरेल

lucky zodiac signs : लक्षणीय प्रगती होईल; या ५ राशींना खरेदी आणि शुभ कामासाठी दिवस मंगलमय ठरेल

Apr 22, 2024 03:06 PM IST

Lucky Rashi Bhavishya 22 April 2024 : आज २२ एप्रिल २०२४ सोमवार रोजी, कोणत्या राशींच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, या ५ राशींचे नशीब चमकेल.

लकी राशीभविष्य २२ एप्रिल २०२४
लकी राशीभविष्य २२ एप्रिल २०२४

आज सोमवार २२ एप्रिल रोजी, कन्या राशीत चंद्राचे भ्रमण होत आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून, या दिवशी हर्ष योग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योगाचा लाभ मिळणार आहे.

मिथुन: 

आज किर्ती प्रसिद्धीचे योग आहेत. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक प्रगतीचा दिवस ठरेल. मन प्रसन्न राहील.

कर्कः 

आज आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. व्यवसायात धाडसाची कामे कराल व यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मन सकारात्मक राहील. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगतीचा दिवस आहे. नावलौकिक वाढेल. मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. 

वृश्चिकः 

आज खरेदी आणि शुभ कामासाठी मंगलमय दिवस आहे. कौटुंबीक सौख्य राहील. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे, किर्ती व मान सन्मान मिळेल. 

धनुः 

आज मन प्रसन्न राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. देश-विदेशात फिरण्याची संधी फायदेशीर राहील. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. अध्यापनामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. घरासंबंधी समस्या दूर होतील. 

मीनः 

आज घरातील अनेक अडचणी सोडवाल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. आर्थिक भरभराट होईल. धाडसी निर्णय घ्याल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. 

Whats_app_banner