आज रविवार २१ एप्रिल रोजी, चंद्र बुध ग्रहाच्या कन्या राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून, या तिथीला प्रदोष व्रत केले जाते. रवि प्रदोष व्रताच्या दिवशी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार रवि प्रदोष तिथीला शुभ योग तयार होत असल्याने या ५ राशींना लाभ होईल.
आज भाग्याची साथ चांगली मिळेल. एखादी गोष्ट व्हावी अशी इच्छा असेल ती पूर्ण होण्याचा काळ आहे. त्यामुळे मूड चांगला राहील. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे लाभदायक ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील.
आज मित्रमंडळींचे सहकार्य लाभणार आहे. कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे. ध्येय गाठण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे.
आज शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती कराल आणि नावलौकिक लाभेल. काम करण्याचा उत्साह वाढेल. त्यामुळे कामाला आपोआपच गती येईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. दुरवरचे प्रवास लाभदायक होतील, भौतिक सुख उत्तम मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील.
आज कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.
आज जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक फायदा चांगला होईल. स्थावर इस्टेटी संबंधी अचानक काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.