Lucky Zodiac Signs : रखडलेली कामे मार्गी लागतील; या ५ राशीच्या लोकांना मिळेल उत्तम नोकरीची संधी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : रखडलेली कामे मार्गी लागतील; या ५ राशीच्या लोकांना मिळेल उत्तम नोकरीची संधी

Lucky Zodiac Signs : रखडलेली कामे मार्गी लागतील; या ५ राशीच्या लोकांना मिळेल उत्तम नोकरीची संधी

May 02, 2024 11:59 AM IST

Lucky Rashi Bhavishya 2 May 2024 : आजच्या दिवशी विविध राशींवर गुरुचा प्रभाव दिसून येईल. यामुळे ५ राशी अशा आहेत, ज्यांना आजचा दिवस लकी ठरणार आहे. तर पाहूया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

नशीबवान राशी २ मे २०२४, लकी राशीभविष्य
नशीबवान राशी २ मे २०२४, लकी राशीभविष्य

आज गुरुवार २ मे रोजी, मकर राशीनंतर चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची नवमी तिथी असून, या दिवशी शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि धनिष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुभ योग तयार होत असल्याने ५ राशींना दिवस फायदेशीर ठरेल.

मेष- 

आजच्या दिवशी चंद्र आणि गुरु संयोग करत आहेत. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. परकीय देशातील व्यवसाय तसेच नोकरी संदर्भातील रखडलेली कामे मार्गी लागतील. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. तुमच्या जोडीदाराची साथ लाभेल. आर्थिक घडामोडी घडतील. तुमच्याकडून मोठी खरेदी होईल. नोकरी-व्यवसायात प्रगती होणार आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

वृषभ- 

आज शुक्ल पक्षात प्रभावी घटना घडणार आहेत. शासकीय नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती होईल. एखादी गोष्ट फक्त विचार करण्याऐवजी व्यवहारात आणण्याचा प्रयत्न कराल. उधारी परत मिळेल. धनलाभामुळे मन आनंदी असेल. कुटुंबात विविध गोष्टींबाबत चर्चा होईल. पत्नी आणि मुलांकडून मनातील अपेक्षा पूर्ण होतील. नातेवाईकांकडून अचानक धनलाभ होईल. नवा व्यवसाय किंवा व्यापार सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. नव्या कामात यश मिळेल.

कर्क- 

आज कर्क राशीच्या लोकांसाठी दूरच्या प्रवासाचे योग घडून येतील. विवाहित व्यक्तीच्या आयुष्यात आनंदी घटना घडतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मोठी संधी मिळेल. आर्थिक गुंतवणूक फलदायी ठरेल. सार्वजनिक ठिकाणी तुमची प्रतिमा उंचावेल. कला क्षेत्रातील लोकांना प्रगतीचे मार्ग खुले होतील. कामाच्या व्यापात थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

सिंह- 

सिंह राशीच्या लोकांना आज आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. कोणत्याही क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. नोकरदारवर्गाला अपेक्षित असलेल्या संधी मिळतील. संगणक क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींनी काळजीपूर्वक मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा. आर्थिक स्थिती स्थिर राहील. घरातील वातावरण आनंदमयी असेल.

तूळ- 

तूळ राशीतील लोकांना आज कुटुंबातील व्यक्तींचा सहवास लाभेल. चर्चेतून चांगल्या गोष्टी घडतील. वाहन खरेदीचा योग जुळून येईल. एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. बऱ्याच दिवसांपासून मनावर ताण कमी होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.

Whats_app_banner