lucky zodiac signs : नवीन रोजगारात, परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल; या ५ राशीच्या लोकांचे नशीब उजळेल
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs : नवीन रोजगारात, परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल; या ५ राशीच्या लोकांचे नशीब उजळेल

lucky zodiac signs : नवीन रोजगारात, परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल; या ५ राशीच्या लोकांचे नशीब उजळेल

Apr 17, 2024 03:59 PM IST

Lucky Rashi Bhavishya 17 April 2024 : आज १७ एप्रिल २०२४ बुधवार रोजी, शूल योग व आश्र्लेषा नक्षत्रात रामनवमी व चैत्र नवरात्री समाप्त होत आहे, शुभ मुहूर्त व योगात कोणत्या ५ राशींना आजचा दिवस खास जाईल, जाणून घ्या.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १७ एप्रिल २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १७ एप्रिल २०२४

आज बुधवार १७ एप्रिल रोजी,चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नववी तिथी आहे, ही तिथी राम नवमी म्हणून ओळखली जाते. तसेच आज चंद्र स्वतःच्या कर्क राशीत असेल आणि गुरु मेष राशीत असेल, यामुळे दोघेही एकमेकांपासून केंद्रस्थानी असतील, चंद्र आणि गुरूच्या या स्थितीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. रामनवमीच्या दिवशी गजकेसरी योगासह रवि योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग ग्रह आणि नक्षत्रांमध्ये होत असल्याने आजचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज कोणत्या ५ राशींना दिवस खास व भाग्यदायक ठरेल, जाणून घ्या.

कर्क: 

आज कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.

सिंह: 

विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. निश्चितच कामकाज किंवा रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. कामातून उत्तम मोबदला मिळू शकतो. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल.

कन्या: 

महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल यशस्वी ठरतील. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. मानसिक स्वास्थ लाभेल. परमेश्वरावरचा विश्वास दृढ होईल. 

कुंभ: 

आज सहकार्य उत्तम ठरेल. सत्ताधारी प्रशासन यांच्या कडून सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. जुनी येणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होईल. 

मीनः 

आज वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल.

Whats_app_banner