मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs : आर्थिकवृद्धी होईल, या ५ राशींना नोकरी व व्यवसायात उत्तम संधी मिळतील

lucky zodiac signs : आर्थिकवृद्धी होईल, या ५ राशींना नोकरी व व्यवसायात उत्तम संधी मिळतील

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 16, 2024 03:22 PM IST

Lucky Rashi Bhavishya 16 April 2024 : आज १६ एप्रिल २०२४ मंगळवार रोजी, शूल योग व आश्र्लेषा योग तयार झाले आहे, शुभ मुहूर्त व योगात ५ राशींसाठी दुर्गाष्टमीचा आजचा दिवस कसा राहील, कोणाला भाग्याची उत्तम साथ मिळेल, जाणून घ्या.

लकी राशीभविष्य १६ एप्रिल २०२४
लकी राशीभविष्य १६ एप्रिल २०२४

आज मंगळवार १६ एप्रिल रोजी, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील ही अष्टमी तिथी आहे, ही तिथी महाअष्टमी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी भगवतीची आठवी शक्ती महागौरीची पूजा केली जाते. तसेच, आज चंद्र स्वतःच्या कर्क राशीत भ्रमण करणार आहे. सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज कोणत्या ५ राशींना दिवस फायदेशीर ठरेल, जाणून घ्या.

मिथुन: 

आज केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. कामाचा उरक चागला राहील. व्यवहार फायदेशीर ठरेल. करिअर मध्ये एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्चयीपणाच्या जोरावर बाजी मारून न्याल. नवीन प्रकल्प हाती येतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. 

कन्या: 

आज वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. नावलौकिक वाढेल. 

तूळ: 

आज यश मिळेल. प्रमोशन मिळण्याचे योग येतील. उधारी वसूल होईल. संधी मिळतील. उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणीं कडून लाभ होतील. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. 

धनुः 

आज आर्थिक प्रगती होईल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल.

कुंभ: 

आज उत्तम सहकार्य मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल.

WhatsApp channel