मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs : जमीन खरेदी-विक्रीतून उत्तम लाभ मिळेल, या ५ राशींना कामात यश येईल

lucky zodiac signs : जमीन खरेदी-विक्रीतून उत्तम लाभ मिळेल, या ५ राशींना कामात यश येईल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 15, 2024 02:15 PM IST

Lucky Rashi Bhavishya 15 April 2024 : आज १५ एप्रिल २०२४ सोमवार रोजी, षडाष्टक योग व सुकर्मा योग तयार झाले आहे, शुभ मुहूर्त व योगात ५ राशींसाठी सप्ताहाचा पहिला दिवस कसा राहील, कोणाला भाग्याची उत्तम साथ मिळेल, जाणून घ्या.

लकी राशीभविष्य १५ एप्रिल २०२४
लकी राशीभविष्य १५ एप्रिल २०२४

आज सोमवार १५ एप्रिल रोजी, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी महासप्तमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी दुर्गेचे सातवे रूप कालरात्रीची पूजा केली जाते. तसेच मिथुन राशीनंतर चंद्र कर्क राशीत जाणार आहे. चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवशी ग्रह-नक्षत्रांमध्ये सुकर्म योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने महत्त्व अधिकच वाढले आहे. आजचा दिवस कोणत्या ५ राशींसाठी लाभदायक आहे, जाणून घ्या.

मिथुनः 

आज तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. खेळाडूंना अपेक्षित यश संपादन करता येईल. 

कन्याः 

आज घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या करिअर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. नवीन धोरणं योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. 

तूळ: 

आज सकारात्मक विचारामुळे उत्साह वाढेल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. आर्थिक आवक वाढेल. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील.

धनुः 

आज व्यवसायिकांना अनुकूल दिवस आहे. कर्जफेडण्यासाठी अनुकूल दिवस आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. मनासारख्या घटना घडण्याचा दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. गायक कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. 

मीनः 

आज चांगली कामे मिळतील. प्रशंसा मिळवाल. घरात चांगली खरेदी कराल, त्यामुळे सर्व खूष राहतील. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी-विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. 

WhatsApp channel