आज रविवार १४ एप्रिल रोजी, चैत्र मासातील शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी आहे. तसेच, चंद्र बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे आणि मेष राशीत सूर्य आणि गुरू सोबत बुधाचा संयोग झाला आहे. चैत्र नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सुकर्म योग, त्रिपुष्कर योग, रवियोग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग ग्रह आणि नक्षत्रांमध्ये होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आजचा दिवस कोणत्या ५ राशींसाठी फायदेशीर आहे, जाणून घ्या.
आज कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे.
आज शुभ फलदायी दिवस ठरेल. वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मन सकारात्मक होईल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. प्रगतीकारक दिनमान आहे. नावलौकिक वाढेल. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत गुणासाठी चांगले वातावरण राहील.
आज अचानक लाभ होण्याचे योग आहेत. उधारी वसूल होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. भरभराटीचा दिवस आहे. सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील.
आज घरातील अनेक अडचणी सोडवाल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होतील. कामाचा दर्जा सुधारेल. आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. नोकरीसंबंधी दिवस लाभाचा ठरेल.
आज उत्तम मोबदला मिळेल. खरेदी आणि शुभ कामासाठी मंगलमय दिवस आहे. गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे.