मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs : या ५ राशीच्या लोकांवर होईल लक्ष्मी कृपा, फायदेशीर बदल होतील

lucky zodiac signs : या ५ राशीच्या लोकांवर होईल लक्ष्मी कृपा, फायदेशीर बदल होतील

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 13, 2024 12:33 PM IST

Lucky Rashi Bhavishya 13 April 2024 : आज १३ एप्रिल २०२४ शनिवार रोजी, लक्ष्मी पंचमी असून, शुभ मुहूर्त व योगात ५ राशींसाठी लक्ष्मी प्राप्तीचा दिवस राहील, जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

लकी राशीभविष्य १३ एप्रिल २०२४
लकी राशीभविष्य १३ एप्रिल २०२४

आज शनिवार १३ एप्रिल रोजी, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी असून, या तिथीला स्कंदमातेची पूजा केली जाते. तसेच आज, वृषभ राशीनंतर चंद्र मिथुन राशीत जाणार आहे. तर शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत उदय अवस्थेत असून, मंगळाशी संयोग घडवत आहे. रवियोग, शोभन योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग लक्ष्मी पंचमीच्या दिवशी होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आजचा दिवस कोणत्या ५ राशींसाठी लक्ष्मी प्राप्तीचा आहे, जाणून घ्या.

मिथुन: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापार वृद्धीचा दिवस राहील. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जीवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वादविवाद मात्र टाळावे. आर्थिक बाबतीत लाभाच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील.

कर्क: 

आज प्रसिद्धी मिळवाल. सामाजिक कार्यात रस घ्याल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागाल. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मक परिणाम दिसतील. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. 

सिंहः 

आज मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न असाल. यशाकडेच वाटचाल राहील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात उधारी वसूल होईल. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. 

कन्याः 

आज आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. नवीन वस्तूंची खरेदी कराल. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापार उद्योगात वृद्धी होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. परदेश भ्रमणाचा योग आहे.

मकरः 

आज फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. दूरच्या प्रवासाचे योग येतील. महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती, मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. 

WhatsApp channel