आज गुरुवार ११ एप्रिल रोजी, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून,देवीचे तीसरे रुप चंद्रघंटाची पूजा केली जाणार आहे. आज मत्स्य जयंती व गौरी तृतीया आहे. तसेच आज चंद्र मेष नंतर वृषभ राशीत जाईल. त्याचवेळी मीन राशीमध्ये राहू, शुक्र आणि सूर्याचा संयोग तयार होत असल्याने अनेक फायदेशीर योग तयार होत आहेत. आज प्रीति योग, आयुष्मान योग, रवि योग आणि कृतिका नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशात चैत्र तृतीयेचा दिवस कोणत्या ५ राशींसाठी धनलाभाचा व सुख-समृद्धीचा आहे, जाणून घ्या.
आज दूरच्या प्रवासाचे योग आहेत. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.
आज व्यापार वृद्धीचा दिवस राहील. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.
आज प्रसिद्धी मिळवाल. सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मक परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. आपले काम पूर्ण कराल.
आज मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. यशाकडेच वाटचाल राहील. कामात यश मिळेल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात उधारी वसूल होईल. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.
आज कष्टाचे चीज होईल. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.
संबंधित बातम्या