मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs : या ५ राशींवर राहील श्री स्वामी समर्थांची कृपा, थकीत रक्कम मिळेल

lucky zodiac signs : या ५ राशींवर राहील श्री स्वामी समर्थांची कृपा, थकीत रक्कम मिळेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 10, 2024 01:41 PM IST

Lucky Rashi Bhavishya 10 April 2024 : आज १० एप्रिल २०२४ बुधवार रोजी, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असून, शुभ मुहूर्त व योगात ५ राशींसाठी दिवस प्रगतीकारक ठरेल, जाणून घ्या या नशीहवान राशी कोणत्या आहेत.

लकी राशीभविष्य १० एप्रिल २०२४
लकी राशीभविष्य १० एप्रिल २०२४

आज बुधवार १० एप्रिल रोजी, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी दुर्गा मातेच्या, ब्रह्मचारिणी रूपाचे पूजन केले जाईल. तसेच, आज श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. चंद्र मंगळच्या मेष राशीत भ्रमण करणार आहे, जेथे गुरु आणि बुध आधीपासूनच आहेत, त्यामुळे गजकेसरी योग, त्रिग्रही योग तयार होत आहेत. या शुभ योगांसोबतच रवियोग, प्रीति योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशात नववर्षाचा दुसरा दिवस कोणत्या ५ राशींसाठी लाभाचा आहे, जाणून घ्या.

मेषः 

आज समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. उद्योग व्यापार नफेत राहील. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल. भाऊबहिणीसी सलोख्याचे संबंध राहतील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील.

वृषभः 

आज चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. चांगली संधी निर्माण होईल. कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. उद्योग व्यवसायात भरभराट होऊ शकते. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. कुटुंबातुन विशेष सहकार्य लाभेल. उत्तम व प्रगतीचा दिवस आहे.

मिथुनः 

आज नोकरी व व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. नोकरीत बदल करायची इच्छा असणाऱ्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. यश निश्चित लाभेल.

कर्कः 

आज फायद्याचा दिवस आहे. अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. कार्यक्षेत्रात वृद्धी होईल. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. 

तूळ: 

आज रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग राहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विदयार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. लाभदायक दिवस आहे. 

WhatsApp channel