मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील, या ५ राशीच्या लोकांना शुभवार्ता मिळेल

Lucky Zodiac Signs : भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील, या ५ राशीच्या लोकांना शुभवार्ता मिळेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 01, 2024 02:41 PM IST

Lucky Rashi Bhavishya 1 May 2024 : आज १ मे २०२४ बुधवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात काही राशींना मे महिन्याचा पहिलाच दिवस भरभराटीचा जाईल. कोण-कोणत्या राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळेल जाणून घ्या.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशी १ मे २०२४
लकी राशीभविष्य, नशीबवान राशी १ मे २०२४

आज बुधवार १ मे रोजी, सूर्याच्या बाराव्या स्थानी बुध आणि मंगळाच्या स्थितीमुळे वेशी राजयोग तयार होत आहे. चंद्र शनीच्या मकर राशीत भ्रमण करत आहे. आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून, या दिवशी शुक्ल योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशीच्या लोकांना आजचा दिवस भरभराटीचा जाईल.

मिथुन: 

आज दिवस शुभ लाभदायी असणार आहे. आर्थिक प्रश्न सुटतील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. अपेक्षित यश संपादन करता येईल. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल.

धनुः 

आज प्रवासाचे योग आहेत. गुणवैशिष्ट्यामुळे आणि स्वभावामुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिवस आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशचा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे राहील. मन प्रसन्न राहील. 

मकर: 

आज कौटुंबीक सौख्य मिळेल. आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वातावरण उत्साही राहील. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. शुभवार्ता ऐकायला मिळेल. 

कुंभः 

आज भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. अभ्यासात प्रगती करून घेता येईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. नविन संधी किंवा प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहील. मन प्रसन्न असल्याने तुमच्या नियोजीत कामाला वेग येईल. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. 

मीन: 

आज आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. आर्थिक गुंतवणूक कराल. मनोरंजनाकडे कल राहील. व्यवसायात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल आत्मविश्वास उंचावलेला असेल. नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. 

WhatsApp channel