Lucky Zodiac signs this week : शुक्राच्या कर्क राशीतील प्रवेशाचा चालू आठवड्यात 'या' तीन राशींना होणार लाभ-lucky zodia signs this week from 29 may to 4 may kark dhanu meen rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac signs this week : शुक्राच्या कर्क राशीतील प्रवेशाचा चालू आठवड्यात 'या' तीन राशींना होणार लाभ

Lucky Zodiac signs this week : शुक्राच्या कर्क राशीतील प्रवेशाचा चालू आठवड्यात 'या' तीन राशींना होणार लाभ

HT Marathi Desk HT Marathi
May 29, 2023 09:41 AM IST

Lucky Zodiac signs this week : ह्या सप्ताहात शुक्र कर्क राशीत प्रवेश करतोय. या राशींना मिळणार सुख समृद्धी आणि लाभ. पाहा कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी!

Kark-dhanu-Meen
Kark-dhanu-Meen

कर्क : सप्ताहात आपणास शुक्रबल लाभणार असल्याने अनपेक्षित आंनदाची बातमी मिळेल. आपल्या कार्य क्षेत्रात वाढ होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी सप्ताह आहे. मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा कालावधी आहे. आनंदी व ऊत्साही सप्ताह राहील. मनात प्रसन्नता असेल. आपणास कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. विद्याभ्यासात प्रगती राहिल. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल.

चंद्रबल शुभ तारीखः २९, ३१,०१,०२

धनु : सप्ताहात शुक्र आपणास आकस्मिक धनलाभ मिळवून देईल. आपणास मोठे आर्थिक लाभ घडविणारे योग आहेत. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. लाभ स्थानातील चंद्रगोचर आणि शुभ योगात वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ मंडळी सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. रविबल उत्तम लाभल्याने विवाह इच्छुकांचे खात्रीशीर विवाहाचे योग आहेत. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. सुख मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. व्यवसायात नवीन प्रकल्प आरंभ कराल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवास आनंददायक होतील.

चंद्रबल शुभ तारीखः ३०, ०१,०२,०४.

मीन : सप्ताहात आपणास शुक्र भ्रमणात मोठे आर्थिक लाभ होईल. व्यापारात आर्थिक उलाढालीतून आकस्मिक धनलाभ होणार आहेत. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक सप्ताह आहे. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहिल. कर्ज प्रकरण मंजुर होतील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभ कालावधी आहे. स्वता:ला सिद्ध कराल. मित्रांकडून मदत मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात यश येईल.

चंद्रबल शुभ तारीखः २९,०१,०२,०४.

 

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)