मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Sign On Palm : नशीबवान लोकांच्या हातात असते अशी खूण; वयाच्या ३५ व्या वर्षीच होतात मालामाल

Lucky Sign On Palm : नशीबवान लोकांच्या हातात असते अशी खूण; वयाच्या ३५ व्या वर्षीच होतात मालामाल

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 04, 2024 05:35 PM IST

Lucky Sign On Palm : हस्तरेषा शास्त्रात तुमच्या हातावर असणाऱ्या रेषा आणि विविध चिन्हांच्या आधारे तुमच्या भविष्याची भाकिते ठरवली जातात. विशेष म्हणजे यात असणाऱ्या धनरेषेचा अभ्यास करुन तुमच्या येणाऱ्या भविष्यातील धनलाभाचे अंदाज बांधता येतात.

हस्तरेषाशास्त्र
हस्तरेषाशास्त्र

जोतिषशास्त्रात राशीभविष्य आणि अंकशास्त्रप्रमाणेच हस्तरेषा शास्त्रालासुद्धा तितकेच महत्व आहे. हस्तरेषा शास्त्रात तुमच्या हातावर असणाऱ्या रेषा आणि विविध चिन्हांच्या आधारे तुमच्या भविष्याची भाकिते ठरवली जातात. विशेष म्हणजे यात असणाऱ्या धनरेषेचा अभ्यास करुन तुमच्या येणाऱ्या भविष्यातील धनलाभाचे अंदाज बांधता येतात. हस्तरेषा शास्त्रानुसार व्यक्तीच्या हातावर असणाऱ्या वेगवेगळ्या खुणा वेगवेगळे संदर्भ दर्शवतात. याच शास्त्रानुसार काही व्यक्तींच्या हातावर अशी एक खूण असते ज्यामुळे तो व्यक्ती अवघ्या वयाच्या पस्तीशीत मालामाल होऊ शकतात. ही कोणती खूण असते आणि कसा त्या चिन्हाच्या हातात असण्यामुळे व्यक्तीला कसा फायदा होतो याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.

हस्तरेषा शास्त्रानुसार, काही व्यक्तींच्या हातावर 'व्ही' (v) अशा अक्षराची खूण असते. हातावर व्ही हे चिन्ह असणाऱ्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अतिशय नशीबवान असतात. या व्यक्तीच्या लोकांना वयाच्या एका टप्प्यावर येऊन अचानक धनलाभ होतो. आणि या व्यक्ती पाहता पाहता धनवान होतात. त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात जोरदार प्रगती होते. एकंदरीत सांगायचे झाले तर, त्यांचे नशीब फळफळते, भाग्याची उत्तम साथ मिळते, धनलाभ होतो.

हातावर कुठे असते अशी खूण?

हस्तरेषा शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या हातावर अशी खूण आढळत नाही. त्यामुळेच ही खूण विशेष आहे. शास्त्र अभ्यासानुसार, तुमच्या हाताच्या तळव्याच्या वर आणि बोटांच्या खाली ही खूण दिसून येते. त्याचा आकार इंग्रजी अक्षर व्ही सारखा असतो. तुमच्या हातावरसुद्धा अशी खूण असेल तर तुमचेसुद्धा नशीब उजळू शकते आणि तुम्ही धनवान होऊ शकतात.

नशीबवान असतात व्ही खूण असणारे लोकं

आपण वाचल्यानुसार शास्त्राप्रमाणे हातावर व्ही खूण असणारे लोक नशीबवान असतात. विशेष म्हणजे हे लोक आपल्या जोडीदारासाठीसुद्धा लकी ठरतात. हे लोक स्वतःची प्रगती करतातच त्यासोबतच आपल्या जोडीदाराचीसुद्धा प्रगती करतात. अशा लोकांचे वैवाहिक आयुष्य अतिशय सुंदर असते. पती पत्नीमध्ये अतिशय प्रेम आणि सामंजस्य असते.

३५ व्या वर्षी फळफळते नशीब

हातावर व्ही अशी खूण असणारे लोक वयाच्या एका टप्प्यानंतर प्रचंड पैसा कमवतात. वयाच्या ३५ व्या वर्षी या लोकांना चांगले दिवस येतात. अर्थातच शास्त्रानुसार त्यांचे नशीब चमकते. नोकरदारवर्गाला अचानक प्रतिष्ठित ठिकाणी मोठ्या पदावर नोकरीची संधी मिळते. अशा लोकांना सरकारी नोकरी मिळण्याची दाट शक्यता असते. हे लोक भरपूर पैसा कमावून आलिशान आयुष्य जगतात.

WhatsApp channel

विभाग