वैदिक शास्त्रानुसार आज ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथी आहे. ही तिथी सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी समाप्त होईल. त्यांनंतर पौर्णिमा तिथीला प्रारंभ होणार आहे. ज्येष्ठ पक्षातील या पौर्णिमेलाच 'वट पौर्णिमा' म्हटले जाते. आज प्रत्येक विवाहित स्त्रियांसाठी हा दिवस अत्यंत खास असणार आहे. दरम्यान आजचा दिवस काही लव्ह कपल्ससाठीसुद्धा अत्यंत चांगला असणार आहे. प्रेम ही एक सुंदर भावना असते. दोन अनोळखी लोक एकत्र येऊन एकमेकांना आपले सर्वस्व समजतात. तसेच एकमेकांसोबत भविष्याची स्वप्ने रंगवतात. काही लोकांचे रिलेशनशिप वर्षानुवर्षे टिकते. तर काही लोकांचे नाते अर्ध्यातच तुटते. ज्योतिषशास्त्रानुसार बहुतांश वेळी लव्ह लाईफवरसुद्धा राशी, ग्रह, नक्षत्र या सर्वांचा प्रभाव पडत असतो. दरम्यान आज कोणत्या राशी प्रेमाच्या बाबतीत नशीबवान ठरणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.
श्रीगणेशाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांची लव्ह लाईफ आज अत्यंत चांगली असणार आहे. आपल्या जोडीदारासोबत मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. मनमोकळा संवाद झाल्याने नात्यात प्रेम वाढीस लागेल. एकमेकांची साथ हवीहवीशी वाटेल. मात्र एकमेकांना समजून घ्यावे लागेल. हे रिलेशनशिप तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येईल. प्रत्येक गोष्टीत एकमेकांची साथ द्यायला तयार राहाल. जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवायला मिळेल. एकमेकांसोबत भविष्याच्या योजना आखाल. एकंदरीत वृषभय राशीच्या लोकांची लव्ह लाईफ चांगलीच बहरणार आहे. या राशीच्या लोकांवर श्रीगणेशाचा वरदहस्त राहणार आहे.
ज्योतिष अभ्यासानुसार कर्क राशीच्या लोकांची लव्ह लाईफसुद्धा चांगली फुलणार आहे. आज तुम्ही तुमच्या भावना जोडीदारासोबत शेअर कराल. त्यातून संवाद होऊन नाते आणखी दृढ होईल. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमचा जोडीदार तुमच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे. या नात्यातून तुम्हाला आनंद आणि सुखसमृद्धी लाभेल. त्यामुळे भविष्याचा विचार करण्यास हरकत नाही. एकमेकांबद्दल आदर वाढेल. आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल. जोडीदारासोबत एका रोमँटिक डेटवर जाण्याची संधी मिळेल. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने मन उत्साही राहील. जोडीदारासोबतचा प्रत्येक क्षण आज खास बनणार आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लव्ह लाईफच्यादृष्टीने अत्यंत चांगला असणार आहे. आज जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. आज एकमेकांसमोर मनातल्या सर्व भावना व्यक्त कराल. या सर्व घडामोडींमध्ये नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडाल. आज तुम्हाला जोडीदाराच्या कुटुंबीयांची संमती मिळू शकते. आपल्या मितभाषी आणि प्रेमळ स्वभावाने त्यांचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल. आजचा दिवस तुमच्यासाठी फारच आनंदाचा असणार आहे. एकमेकांच्या कुटुंबासोबत विवाहाच्यादृष्टीने चर्चा घडून येईल. मनाप्रमाणे गोष्टी घडत असल्याने थोडेसे भावनिक व्हाल. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. आज या लोकांच्या लव्ह लाईफमध्ये मोठी घडामोड घडणार आहे. आज तुम्हाला एखाद्या आवडत्या व्यक्तीकडून प्रपोजल मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षितपणे प्रपोजल मिळाल्याने थोडासा गोंधळ उडेल. मात्र तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्याल. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचा जोडीदारासोबत मूड अगदी रोमँटिक असणार आहे. एकमेकांची साथ हवीहवीशी वाटेल. गप्पागोष्टी रंगतील त्यातून एकमेकांच्या आवडीनिवडी समजतील. जोडीदाराला भेटवस्तू देण्याचा विचार मनात येईल. एकंदरीत आज तुमच्या लव्ह लाइफला नवा बहर येणार आहे.
संबंधित बातम्या