हिंदू धर्मात भगवान विष्णूला अनन्यसाधारण महत्व आहे. असूरांचा नाश करण्यासाठी विष्णूने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण हे अवतार घेतले. तर दहावा अवतार कलकीच्या रूपात असेल, असे मानले जाते. चार हात असणारया विष्णूच्या एका हातात शंख, दुसरया हातात सुदर्शन चक्र, तिसर्या हातात कमळ तर चौथ्या हातात गदा असते. प्रत्येक महिन्यात येणारे एकादशीचे व्रत भगवान विष्णू यांना समर्पित आहे.
भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला सुख-समृद्धीचे वरदान मिळते. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी विशेष मानला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्यास व्यक्ती जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्त होतो. हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, जो व्यक्ती भगवान विष्णूची पूजा करतो त्याला जास्त आर्थिक समस्या येत नाहीत. ज्योतिष शास्त्रामध्ये चार राशींचा उल्लेख केला आहे ज्यावर भगवान विष्णूचा आशीर्वाद नेहमीच असतो. त्या भाग्यवान राशींमध्ये तुमचाही समावेश आहे की नाही ते जाणून घेऊया.
वृषभ ही भगवान विष्णूची प्रिय राशी मानली जाते. या राशीचे लोक मेहनती आणि प्रभावशाली असतात. भगवानांची आवडती राशी असल्यामुळे या राशीच्या लोकांना भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत असे मानले जाते. गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूची नियमित पूजा केल्याने तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात.
कर्क राशीचे नाव भगवान श्री हरी विष्णूच्या आवडत्या राशींमध्ये समाविष्ट आहे. देवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळते. या राशीचे लोक खूप मेहनती असतात. नोकरी व व्यवसायात आर्थिक लाभ मिळवतात. देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी दर गुरुवारी पिवळे कपडे घाला.
सिंह राशीच्या लोकांना भगवान विष्णूचा अपार आशीर्वाद असतो. या राशीच्या लोकांना जास्त आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही. देवाच्या कृपेमुळे या राशीचे लोक प्रत्येक काम कुशलतेने पूर्ण करतात. त्याचबरोबर त्यांना समाजात खूप मान-सन्मान मिळतो. गुरुवारी विष्णू सहस्रनामाचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ राहील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)