मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  निवडणुकीच्या निकालाआधी हे २ ग्रह बदलणार स्थान! राजकीय क्षेत्रावर असतो त्यांचा मोठा प्रभाव

निवडणुकीच्या निकालाआधी हे २ ग्रह बदलणार स्थान! राजकीय क्षेत्रावर असतो त्यांचा मोठा प्रभाव

May 31, 2024 10:45 AM IST

Astrology Prediction LokSabha election 2024 : येत्या ४ जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी जोतिषशास्त्रानुसार राजकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे बदल घडणार आहेत.

लोकसभा निवडणूक ज्योतिष भाकीत, ग्रहांचे राशीपरिवर्तन
लोकसभा निवडणूक ज्योतिष भाकीत, ग्रहांचे राशीपरिवर्तन

देशात सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणूक आता आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. यामध्ये कोणता पक्ष बाजी मारणार? कोणाचे सरकार येणार? कोण सत्ता स्थापन करणार? असे अंक प्रश्न जनतेच्या मनात घोळत आहेत. येत्या ४ जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी जोतिषशास्त्रानुसार राजकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे बदल घडणार आहेत. या बदलांचा निवडणुकीच्या निकालावरसुद्धा परिणाम होण्याची शक्यता जोतिष शास्त्रात वर्तवली गेली आहे.

१९ एप्रिल २०२४ पासून देशात निवडणुकीचे वारे वाहात आहे. एकूण ७ टप्प्यात या निवडणूका पार पडत आहेत. १ जून २०२४ रोजी या निवडणुकीचा अंतिम म्हणजेच सातवा टप्पा पार पडणार आहे. त्यांनंतर ४ जून २०२४ रोजी निवडणूक आयोगाकडून याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान जोतिष शास्त्रात एक महत्वाचा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी काही ग्रह-नक्षत्र आपले स्थान बदलणार आहेत आणि या हालचालींचा विशेष परिणाम राजकीय क्षेत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. कोणते ग्रह आपली राशी बदलणार? आणि त्यांचा राजकीय क्षेत्रावर कसा परिणाम होणार याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

बुध करणार राशी परिवर्तन-

जोतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाला सर्व ग्रहांचा राजा म्हणून संबोधले जाते. त्यामुळे बुधच्या हालचालींचा मोठा प्रभाव राशींवरसुद्धा दिसून येतो. दरम्यान ३१ मे रोजी बुध आपली राशीपरिवर्तन करत मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हे राशी परिवर्तन होणार आहे.

राजकीय क्षेत्रावर बुध ग्रहाचा विशेष प्रभाव-

बुध ग्रहाला ग्रहांचा राजा म्हटले जाते हे आपल्याला माहिती आहे. मात्र अनेकांना माहिती नसेल की, बुध ग्रह ज्या राशीत विराजमान असतो त्या राशीच्या लोकांचे नशीब उजळते. ज्या राशीमध्ये बुध ग्रह बळकट असतो ते लोक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी झेप घेतात. बुधाच्या शुभ कृपेने या राशीचे लोक अतिशय चाणाक्ष, वैचारिक आणि राजकारणात सक्षम बनतात.

मंगळ ग्रह करणार राशीपरिवर्तन-

मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखले जाते. एखाद्या राशीवर मंगळ शुभ प्रभाव असेल, तर राशीच्या लोकांना भरभराटीचे दिवस येतात. १ जून रोजी मंगळ ३ वाजून ३९ मिनिटांनी राशी परिवर्तन करणार आहे. यावेळी मंगळ मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 

मंगळ आपल्या स्वराशीत आल्याने अतिशय शक्तिशाली होणार आहे. आणि जोतिष शास्त्रानुसार मंगळ एक असा ग्रह आहे जो राजकीय क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी मदत करतो. त्यामुळेच मंगळच्या शुभ प्रभावाचा राजकीय क्षेत्रावरसुद्धा परिणाम दिसून येणार आहे. मंगळच्या शुभ प्रभावाने एखादी व्यक्ती अतिशय बळकट आणि ताकदवान बनते.

WhatsApp channel