लायन गेट पोर्टल म्हणजे काय, या दिवशी लिहिलेल्या इच्छा पूर्ण होतील का, या दिवशी इच्छा कशा लिहायच्या आणि केव्हा लिहायच्या, असे प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतील. याबाबत सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ बनवण्यात आले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तुम्ही या दिवशी तुमच्या इच्छा लिहून ठेवल्यास त्या पूर्ण होतील, असे सांगण्यात येत आहे.
ज्योतिषी, टॅरो कार्ड वाचक, अंकशास्त्रज्ञ यावर व्हिडिओ बनवत आहेत. टॅरोकार्ड वाचक रिद्धिमा यांच्या मते, आज रात्री ८ वाजता तुमच्या घरात दिवा लावा आणि तुमची इच्छा ८ वेळा वाचा. ॲनी बॅनर्जीने तिच्या इंस्टाग्राम रीलमध्ये असेही सांगितले की, ८ तारखेला तुम्हाला पिवळ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि त्यावर तुमच्या इच्छा लिहायच्या आहेत. त्यावर लाल पेनाने इन्फिनिटी चिन्ह बनवावे लागेल आणि त्याच्या खाली पूर्ण नाव लिहावे लागेल. यानंतर देवघरात हा इच्छा लिहीलेला कागद ठेवा आणि रात्री १२ वाजता तोच कागद घेऊन सकाळी ८ वाजता कापूर जाळून त्याची राख हवेत उडवा.
ज्योतिषी गौरव कटारे यांच्या इंस्टाग्राम रीलमध्ये त्यांनी सांगितले आहे की, ८ तारखेला एका कागदावर आठ इच्छा लिहाव्या लागतात, आठ वर्षे लिहिल्यानंतर तो कागद दुमडून ठेवावा लागतो. त्यांनी सांगितले असले तरी त्यांचा त्यावर विश्वास नाही असेही ते म्हणाले आहे.
नीती कौशिकच्या यूट्यूब चॅनेलवर, तिने लायन गेट पोर्टल काय आहे हे स्पष्ट केले, तिने सांगितले की पृथ्वी, सूर्य, सर्व तारे नक्षत्र सर्व एकाच रेषेत येतात तेव्हा हे पोर्टल तयार होते. आठ हे अनंताचे लक्षण आहे. म्हणून, आपण यावेळी बऱ्याच गोष्टी प्रकट करू शकता. त्यांनी सांगितले की हे पोर्टल १६ ऑगस्टपर्यंत खुले राहील, त्यामुळे तुम्ही तोपर्यंत तुमची इच्छा लिहू शकतात.
दरवर्षी ऑगस्ट महिन्यात एक ज्योतिषीय घटना घडते जी लायन गेट पोर्टल म्हणून ओळखली जाते. जेव्हा पृथ्वी, आपल्या आकाशगंगेतील एक ग्रह सिरियस आणि ओरियन नक्षत्र संरेखित केले जातात तेव्हा लायन गेट पोर्टल उद्भवते. ही खगोलीय घटना शक्तिशाली उर्जेचे एक पोर्टल तयार करते, ज्याचा स्वामी सूर्य मानला जातो.
ज्योतिषी म्हणतात की लायन्स गेट पोर्टल लोकांच्या आकांक्षांना चालना देते, त्यांना नवीन कल्पना आणि आकांक्षा प्रकट करण्यास अनुमती देते आणि त्यांची आध्यात्मिक ऊर्जा वाढवते.