मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Laxmi Narayan Yog : ५० वर्षांनंतर जुळून येणार लक्ष्मी नारायण योग; होणार धनलाभ, मिळणार चांगला पगार

Laxmi Narayan Yog : ५० वर्षांनंतर जुळून येणार लक्ष्मी नारायण योग; होणार धनलाभ, मिळणार चांगला पगार

HT Marathi Desk HT Marathi
May 03, 2024 01:34 PM IST

Laxmi Narayan Yog : अतिशय शुभ समजला जाणारा लक्ष्मी नारायण योग तब्बल ५० वर्षांनी जुळून आला आहे. हा योग काही राशींसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

५० वर्षांनंतर जुळून येणार लक्ष्मी नारायण योग; होणार धनलाभ, मिळणार चांगला पगार
५० वर्षांनंतर जुळून येणार लक्ष्मी नारायण योग; होणार धनलाभ, मिळणार चांगला पगार

जोतिषशास्त्रात जसे काही योग अशुभ असतात. तसेच काही योग अतिशय शुभ असतात. या शुभ योगामध्ये बऱ्याचवेळा आपल्या इच्छा पूर्ण होऊन पैशांचा पाऊस पडू शकतो. असाच एक शुभ योग म्हणजे लक्ष्मी नारायण योग होय. 

लक्ष्मी नारायण योग आपल्या संस्कृतीत अतिशय शुभ समजला जातो. यंदाचा महिना अनेक राशींसाठी अतिशय खास असणार आहे. कारण या राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपादृष्टी राहणार आहे.तब्बल ५० वर्षांनी लक्ष्मी नारायणाचा योग जुळून आला आहे. ज्या राशीत एकाच दिशेत शुक्र आणि बुधची युती होते, त्याला लक्ष्मी नारायण योग म्हणून संबोधले जाते. सध्या शुक्र मेष राशीत विराजमान आहेत. दरम्यान बुद्धीदेवता बुधसुद्धा १० मे रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्र आणि मेष एकाच राशीत आल्याने हा लक्ष्मी नारायणाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगच फायदा कोणत्या कोणत्या राशीला होणार याबाबत जाणून घेऊया.

वृषभ

तब्बल ५० वर्षांनी आलेल्या लक्ष्मी नारायण योगचा उत्तम फायदा वृषभ राशीला होणार आहे. या दरम्यान अनेक दिवसांपासून अडकून राहिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच कमाईचे विविध सुलभ मार्ग खुले होतील. पैशांची चणचण मोठ्या प्रमाणात नाहीशी होईल. कुटुंबासोबत संवाद वाढेल. चर्चेतून कौटुंबिक वादविवाद सुटतील. लक्ष्मी योग असल्याने कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार होण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. अनेक दिवसांपासून आखत आलेल्या योजना पूर्ण होतील. देशात व्यवसायाचा विस्तार होऊन आर्थिक लाभ होईल.

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठीसुद्धा लक्ष्मी नारायण योग अतिशय शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांनां प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या कला कौशल्यांचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. कामाच्या ठिकाणी पगारवाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पैशांची बचत होऊन सेव्हिंग वाढेल. सोबतच आधी केलेल्या गुंतवणूकीचा आता फायदा मिळू शकतो. व्यवसायात प्रचंड लाभ मिळेल. अनेक मोठ्या गुंतवणुकी कराल.त्यातूनही नफाच होईल.

सिंह

वृषभ आणि मिथुनप्रमाणेच सिंह राशीच्या लोकांसाठीसुद्धा लक्ष्मी नारायण योग अतिशय उत्तम असणार आहे.एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी ही वेळ शुभ आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तक्रारी संपुष्टात येतील. जुनी उधारी वसूल होईल. लक्ष्मी नारायण योग असल्याने यंदा घर, जमीन, वाहन यापैकी संपत्ती घेण्याची इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल. आत्मविश्वास वाढेल. भविष्याच्यादृष्टीने पैशांची बचत कराल. कामानिमित्त बाहेर फिरणे होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल.

WhatsApp channel