ज्योतिष अभ्यासानुसार, ग्रहांच्या भ्रमणाचा एक ठराविक कालावधी असतो. यामध्ये चंद्र सर्वात कमी कालावधीत भ्रमण करत असतो. चंद्राच्या भ्रमणातून दररोज नवनवीन शुभ-अशुभ योगांची निर्मिती होत असते. हे योग काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात तर काहींसाठी नुकसानदायक ठरतात. आज चंद्र सूर्यदेवाची राशी सिंह राशीत भ्रमण करत आहे. चंद्राच्या सूर्य राशीत प्रवेशाने अनेक शुभ योग जुळून आले आहेत. यामध्ये रवी योग, लक्ष्मी नारायण योग आणि मघा नक्षत्राचा शुभ संयोग यांचा समावेश आहे. आज लक्ष्मी नारायण योग काही राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. पाहूया त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत.
मिथुन राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अत्यंत शुभ लाभ देणार आहे. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला त्याचा चांगला परतावा मिळेल. तुम्हाला अनेक महत्वाच्या बाबतीत आईची साथ मिळेल. त्यामुळे मन आनंदी आणि उत्साही राहील. व्यापारी त्यांच्या योजनांद्वारे यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळतील. व्यवसायाचा चांगला विस्तार होईल. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील.
कन्या राशीच्या लोकांसाठी आज लक्ष्मी नारायण योगाचा दिवस अत्यंत चांगला असणार आहे. आज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. शिवाय समाजात तुमचा रुबाब वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. धार्मिक-अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. भविष्याच्या दृष्टीने केलेल्या आर्थिक योजनेतून लाभ मिळायला सुरुवात होईल. नोकरदार वर्गाला बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. जोडीदारासोबत मूड रोमँटिक राहील. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटेल. नात्यात सकारात्मक बदल दिसून येतील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग फलदायी ठरणार आहे. याकाळात तुम्हाला अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. आर्थिक आवक वाढेल. त्यामुळे घरात भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. ऐषोरामी आयुष्य जगण्याकडे कल राहील. आरोग्याच्या समस्या आज दूर होतील. प्रकृती उत्तम राहील. सासुरवाडीतील लोकांसोबत असलेले मतभेद दूर होतील. जोडीदारासोबत नव्याने आयुष्याची सुरुवात कराल. विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांना विवाहाचे प्रस्ताव येण्याचा योग आहे.
लक्ष्मी नारायण योग धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास असणार आहे. या योगात तुमची लव्ह लाईफ बहरणार आहे. आज काही लोक जोडीदाराची घरच्यांसोबत भेट घालून देतील. त्यातून अनेकांना शुभ संकेत मिळतील. लग्नासाठी परवानगी मिळेल. त्यामुळे मन आनंदी राहील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचा योग आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. याकाळात अनपेक्षित धनलाभ होतील.