वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठराविक कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. ग्रहांच्या या गोचरने विविध योग जुळून येत असतात. हे योग राशीचक्रातील बाराही राशींवर प्रभाव टाकत असतात. यामध्ये काही राशींसाठी योग सकारात्मक परिणाम देतात. तर काही राशींना नकारात्मक प्रभाव देतात. हे योग राशींचे भविष्य ठरवत असतात. त्यामुळेच ग्रहांच्या हालचाली आणि त्यापासून निर्माण होणारे योग याकडे लक्ष देणे ज्योतिषीय अभ्यासात अत्यंत गरजेचे असते. आजसुद्धा लक्ष्मी नारायण हा अत्यंत शुभ योग जुळून येत आहे.
सध्या जुलै महिना सुरु आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह गोचर करत आहेत. या गोचरमधून अनेक योग घटित होत आहेत. नुकतंच सूर्याने कर्क राशीत प्रवेश केला आहे. याआधी बुध आणि शुक्रसुद्धा त्याच राशीत विराजमान आहेत. आता हे तिन्ही ग्रह एकत्र विराजमान होऊन विविध योगाची निर्मिती करत आहेत. दरम्यान शुक्र आणि बुधच्या संयोगातून 'लक्ष्मी नारायण' हा अत्यंत शुभ योग जुळून येत आहे. याचा राशीचक्रातील काही राशींना प्रचंड फायदा मिळणार आहे. पाहुयात त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.
मिथुन राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण योगाचा विशेष लाभ मिळणार आहे. या योगात तुमच्या उद्योग-व्यापारात प्रचंड नफा होणार आहे. अनेक दिवसांपासून एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. कमाईत वाढ होऊन आर्थिक स्थिती सुधारेल. घरात सुखसमृद्धी येईल. पैशांची आवक वाढल्याने विविध गोष्टींची खरेदी होईल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कार्याने प्रभावित होतील. त्यातून एखादी मोठी जबाबदारी पदरात पडेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल.
कर्क राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण योगाचा फायदा होणार आहे. आज महत्वाच्या कामात वडिलांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे अडचणीतून सुटका होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. त्यातून मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळेल. मित्रांसोबत झालेले मतभेद दूर होतील. त्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होईल. शासकीय कार्यात आज तुम्हाला यश लाभेल.
मकर राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण योगाचा फायदा मिळणार आहे. या योगात तुम्हाला धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. तुमच्या हातून धार्मिक कार्ये घडून येतील. मन प्रसन्न आणि उत्साही राहील. स्थावर मालमत्ता खरेदीचा विचार असेल तर आज त्यादिशेने वाटचाल होईल. बँकिंग क्षेत्रातील व्यक्तींना आज लाभ होईल. तुम्हाला मिळकतीचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक संपत्तीत वाढ होईल. घरात महागड्या वस्तूंची खरेदी होईल. वैवाहिक व्यक्तींच्या आयुष्यात गोडवा येईल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होऊन नातेसंबंध आणखी घट्ट होतील.
संबंधित बातम्या