Lakshmi Narayan Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठराविक काळानंतर राशीपरिवर्तन करत असतात. अशा स्थितीत ग्रह एका राशीतून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. यालाच गोचर असे संबोधले जाते. ग्रहांच्या या गोचरमधून विविध योग आणि युती जुळून येतात. दरम्यान लवकरच धन दाता शुक्र आणि व्यापार दाता बुध यांची युती होणार आहे. हे दोन्ही ग्रह सिंह राशीमध्ये लवकरच एकत्र येणार आहेत. ही युती अत्यंत शुभ मानली जात आहे.
येत्या ३१ जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. जिथे बुध ग्रह आधीच उपस्थित आहे. सूर्य राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होणे खूप फायदेशीर मानले जाते. अशा स्थितीत सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे जुळून आलेल्या लक्ष्मी नारायण योगाचा फायदा कोणत्या राशींना मिळणार ते जाणून घेऊया.
बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तयार झालेला लक्ष्मी नारायण योग मेष राशीच्या काही लोकांना धनवान बनवू शकतो. उद्योजक-व्यापाऱ्यांसाठी हा काळ अतिशय चांगला समजला जातो. याकाळात विविध मार्गाने तुम्हाला धनलाभ होईल. त्यामुळे जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याची योजना आखाल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होऊन नातेसंबंध सुधारतील. आरोग्य उत्तम राहील.
बुध आणि शुक्राच्या युतीमधून जुळून आलेला लक्ष्मी नारायण योग सिंह राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. कारण हा योग सिंह राशीमध्येच निर्माण होत आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. हातात घेतलेली कामे विनाअडथळा पूर्ण होतील. व्यावसायिकांना चांगला आर्थिक नफा होईल. मिळकतीचे नवनवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. त्यातून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. धार्मिक-अध्यात्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील.
लक्ष्मी नारायण योग अत्यंत शुभ समजला जातो. सिंह राशीत तयार होत असलेला हा योग तूळ राशीसाठीसुद्धा लाभदायक ठरणार आहे. याकाळात तुमच्या आयुष्यात सुरु असलेल्या अडचणी दूर होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. रेंगाळलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. अचानक धनलाभ होण्याचे प्रसंग घडतील. पुरेसा पैसा हातात आल्याने आत्मविश्वास वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मनावर असलेला ताण दूर होईल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. समाजात तुम्हाला मानसन्मान प्रतिष्ठा प्राप्त होईल.
संबंधित बातम्या