वैदिक शास्त्रानुसार ग्रह एका निश्चित कालावधीत गोचर करत असतात. अर्थातच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. नऊ ग्रह गोचरसाठी वेगवेगळा कालावधी घेत असतात. जेव्हा ग्रह एका राशीतून निघून दुसऱ्या राशीत जातात, तेव्हा नवनवीन योगांची निर्मिती होत असते. हे योग काही राशींसाठी अत्यंत सकारात्मक असतात. तर काही राशींसाठी अत्यंत नकारात्मक असतात. आज बुध कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तर लवकरच शुक्रसुद्धा सिंह राशीत विराजमान होणार आहे.
ज्योतिषीय अभ्यासानुसार आज १९ जुलै २०२४ रोजी बुध रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी कर्क राशीतून सिंह राशीत गोचर करणार आहे. दरम्यान येत्या ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत शुक्र आणि बुध सिंह या एकाच राशीत विराजमान होणार आहेत. या दोघ्यांच्या संयोगातून अनेक शुभ योग घटित होतील. या योगांचा फायदा राशीचक्रातील काही राशींना होणार आहे. त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मिथुन राशीच्या लोकांना बुध आणि शुक्राच्या संयोगाचा लाभ मिळणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ लाभेल. तुम्ही योजिलेले सर्व महत्वाची कामे व्यवस्थित पार पडतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. त्यातून तुम्हाला बढती किंवा पगारवाढ देण्याचा विचार होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. अविवाहित लोकांनां विवाहाचे प्रस्ताव येतील. एकंदरीत ही युती तुम्हाला लाभदायक असणार आहे.
मेष राशीत शुक्र आणि बुधच्या युतीने निर्माण झालेल्या लक्ष्मी नारायण योगाचा विशेष लाभ मिथुन राशीच्या लोकांना मिळणार आहे. याकाळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. हातात घेतलेली सर्व कामे पूर्णत्वास जातील. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. त्यामुळे मन उत्साही राहील. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखाल. विविध मार्गाने धनलाभ होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम होईल. अशातच संपत्ती खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. शेअर मार्केटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्य उत्तम राहील.
सिंह राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण योगाचा उत्तम लाभ मिळणार आहे. याकाळात अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. त्यामुळे मनाला समाधान लाभेल. तुमच्या प्रत्येक कार्यात कुटुंबातील लोकांची पूर्ण साथ मिळेल. त्यामुळे तुमच्या सर्वच कामात यश प्राप्त होईल. उद्योग-व्यापारात तुम्हाला मोठा आर्थिक नफा होईल. मिळकतीचे नवनवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आयुष्यात सकारात्मक प्रभाव पडेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
संबंधित बातम्या