Lakshmi Narayan Yog : वर्षाअखेर पर्यंत या राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा! कर्जातून मिळणार मुक्ती
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lakshmi Narayan Yog : वर्षाअखेर पर्यंत या राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा! कर्जातून मिळणार मुक्ती

Lakshmi Narayan Yog : वर्षाअखेर पर्यंत या राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा! कर्जातून मिळणार मुक्ती

Published May 16, 2024 06:45 PM IST

Lakshmi Narayan Yog 2024 : जोतिषशास्त्रानुसार राशीचक्रातील काही राशींवर वर्षभर लक्ष्मीची कृपा राहणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत या राशींची आर्थिक भरभराट होणार असल्याचे दिसून येत आहे.

लक्ष्मी नारायण योग २०२४
लक्ष्मी नारायण योग २०२४

देवी लक्ष्मीला धन-वैभवाची देवी म्हटले जाते. ज्या लोकांवर लक्ष्मीची कृपा असते. त्यांना आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. जोतिषशास्त्रानुसार राशीचक्रातील काही राशींवर वर्षभर लक्ष्मीची कृपा राहणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत या राशींची आर्थिक भरभराट होणार असल्याचे दिसून येत आहे. या राशींना डिसेंबरपर्यंत शुभ काळ असणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर लक्ष्मीची कृपा लाभणार आहे.

कोणत्या राशींवर राहणार देवी लक्ष्मीची कृपा?

मेष 

मेष राशीसाठी हे वर्ष अतिशय उत्तम असणार आहे. या वर्षाअखेर पर्यंत मेष राशीवर देवी लक्ष्मीची कृपा राहणार आहे. त्यामुळे हा काळ मेष राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या लोकांना हातात घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळेल. आर्थिक कमतरता अजिबात भासणार नाही. विविध मार्गाने अचानक धनलाभ होईल. जोडीदारासोबत संबंध सुधारतील. महत्वाच्या कामात जोडीदाराची साथ लाभेल. ज्या लोकांना विवाह जुळण्यास अडचणी येत आहेत त्यांचे विवाह ठरतील. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना आर्थिक लाभ होईल. व्यवसाय आणखी विस्तारेल. याकाळात तुमचे व्यक्तिमत्व आणखी जास्त उठून दिसेल.

मिथुन

मिथुन राशीवरसुद्धा देवी लक्ष्मीची कृपा राहणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. कामानिमित्त परदेशवारी होऊ शकते. यामधूनसुद्धा फायदाच होणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास हा काळ उत्तम आहे. आता केलेल्या गुंतवणुकीचा लवकरच लाभ मिळणार आहे. मनात योजिलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्णत्वास जातील. नव्या करण्यासाठी ही वेळ अतिशय शुभ आहे.

सिंह

मेष आणि मिथुन राशीप्रमाणे सिंह राशीवरसुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीच्या कृपेचा अत्यंत फायदा होणार आहे. तुमच्या कार्यासाठी तुम्हाला पुरस्कार आणि रोख रक्कमसुद्धा मिळू शकते. वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होऊन जुन्या आजारांपासून दिलासा मिळेल. त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा आनंदी आणि उत्साही असेल. तुम्हाला प्रत्येक कार्यात भाग्याची चांगली साथ मिळेल. त्यामुळे साकारत्मकता निर्माण होईल.

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय करावे?

हिंदू शास्त्रानुसार, सकाळची वेळ सर्व देवी-देवतांसाठी अतिशय प्रिय असते. त्यामुळे या काळात काही अध्यात्मिक कार्य करुन देवी-देवतांना प्रसन्न करण्यास योग्य वेळ असते. शास्त्रानुसार सकाळच्या प्रहरी एक गोष्ट केल्याने लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होते. आणि त्यामुळे घरामध्ये कधीच पैशांची अथवा धान्याची कमतरता भासत नाही. या मान्यतेनुसार, सकाळी स्नान करुन देवघरातील लक्ष्मी चरणांचे पूजन केल्याने देवी प्रसन्न होते.

तसेच आपल्या घरासमोर देवी लक्ष्मीच्या चरणांची रांगोळी घातल्यास घरात धन धान्यांची भरभराट होते. शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला लाल रंग अतिशय खास आहे. त्यामुळे देवीच्या पाऊलांची रांगोळी घालताना नेहमी लाल रंग वापरल्यास अत्यंत शुभ ठरते. घराचे प्रवेशद्वार लाल रंगाच्या फुलांनी सजवल्याससुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

Whats_app_banner