मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lakshmi Narayan Yog : लक्ष्मी नारायण योग प्रेमीयुगलांसाठी फारच खास! कुणी रोमँटिक डेट तर कुणी करणार लग्नाची चर्चा

Lakshmi Narayan Yog : लक्ष्मी नारायण योग प्रेमीयुगलांसाठी फारच खास! कुणी रोमँटिक डेट तर कुणी करणार लग्नाची चर्चा

Jun 30, 2024 10:27 AM IST

Lakshmi Narayan Raj Yog : लक्ष्मी नारायण राजयोग काही राशीच्या प्रेमीयुगलांसाठी अत्यंत खास असणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.

लक्ष्मी नारायण योग
लक्ष्मी नारायण योग

अवघ्या एका दिवसांनंतर जुलै महिना सुरू होणार आहे. जुलै महिन्यात ज्योतिष शास्त्रातील अनेक समीकरणे बदललेली पाहायला मिळणार आहेत. येत्या जुलै महिन्यात अनेक ग्रह स्थान बदल करणार आहेत. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर केल्याने विविध शुभ-अशुभ योगाची निर्मिती होणार आहे. या योगांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर झालेलं पाहायला मिळणार आहे. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा आणि हालचालींचा परिणाम राशींच्या प्रेम जीवनावरसुद्धा झालेला पाहायला मिळतो.

चंद्राने वृषभ राशीत प्रवेश केल्याने त्याचा गुरुशी संयोग होऊन 'गजकेसरी राजयोग' तयार होत आहे. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी शुक्र कर्क राशीत गोचर करत आहे. शुक्राच्या या गोचरने 'लक्ष्मी नारायण राजयोग' तयार होत आहे. तत्पूर्वी बुध आधीच कर्क राशीत विराजमान आहे. येत्या ७ जुलै रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करुन लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती करेल. लक्ष्मी नारायण राजयोग काही राशीच्या प्रेमीयुगलांसाठी अत्यंत खास असणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.

वृषभ

लक्ष्मी-नारायण राजयोगात वृषभ राशीच्या लोकांना प्रचंड लाभ मिळणार आहे. याकाळात तुमच्या लव्ह लाईफमध्ये आनंद आणि उत्साह राहील. अनेक प्रेमीयुगलांना घरातील मोठ्या लोकांचा आशीर्वाद लाभेल. लग्नाची बोलणी होऊन नाते जुळून येण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत आठवडा अगदी उत्तम जाणार आहे. एकमेकांना समजून घेतल्याने नात्यात प्रेम आणि आदर वाढेल. एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाल्याने मनमोकळा संवाद होऊन. जोडीदाराबद्दल काही गोष्टी नव्याने समजतील. त्याचा नात्याला फायदाच होणार आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योगात हा आठवडा लव्ह लाईफच्यादृष्टीने आनंद आणि समृद्धीचा असेल. प्रेमसंबंधात हा वेळ अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखाल. प्रवासादरम्यान एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळेल. मनमोकळा संवाद होऊन नाते अधिक मजबूत होईल. काही प्रेमीयुगल रोमँटिक डेटवर जाण्याची योजना करतील. त्यामुळे नात्यामध्ये उत्साह आणि प्रेम राहण्यास मदत होईल. एकमेकांबद्दल आदर वाढेल. भविष्याच्या दृष्टीने योजना बनवू शकता.

कर्क

कर्क राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खास असणार आहे. लक्ष्मी नारायण योगात कर्क राशीच्या लोकांची लव्ह लाईफ आणखी बहरेल. जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडाल. पहिल्या भेटीच्या आठवणीत रमाल. शिवाय विवाहाच्या दृष्टिकोनातून चर्चा घडून येईल. अनेक प्रेमीयुगल आपल्या नात्याबाबत घरात कल्पना देण्यात यशस्वी होतील. मात्र कुटुंबीयांची मर्जी मिळवणे इतके सोपे नसेल. परंतु त्यातून यशस्वी मार्ग काढाल. काही लोकांना आज जोडीदार मिळण्याचा योग आहे. एकंदरीत कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाचा आठवडा असणार आहे.

WhatsApp channel