मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  July Rajyog : जुलैमध्ये एकाच वेळी जुळून येणार तब्बल २ राजयोग! 'या' राशींना मिळेल बक्कळ पैसा, लाभेल यश

July Rajyog : जुलैमध्ये एकाच वेळी जुळून येणार तब्बल २ राजयोग! 'या' राशींना मिळेल बक्कळ पैसा, लाभेल यश

Jul 02, 2024 02:38 PM IST

July 2024 Rajyog : जुलैमध्ये एक नव्हे तर तब्बल ४ मोठे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. दरम्यान ग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

जुलै २०२४ राजयोग
जुलै २०२४ राजयोग

नुकतंच जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. कॅलेंडरनुसार महिना बदलल्यानंतर ज्योतिषशास्त्रातील काही समीकरणेसुद्धा बदलेली पाहायला मिळत आहेत. जुलै महिन्यात अनेक महत्वाच्या ज्योतिषीय घडामोडी घडणार आहेत. ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशीपरिवर्तन करत असतात. या राशीपरिवर्तनातून विविध शुभ-अशुभ योग-राजयोग जुळून येत असतात. जुलै महिन्यातसुद्धा असंच काहीसं असणार आहे. जुलैमध्ये एक नव्हे तर तब्बल ४ मोठे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. दरम्यान ग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

जुलै महिन्यात राशी परिवर्तन करणाऱ्या मोठ्या ग्रहांच्या यादीत सूर्याचादेखील आवर्जून समावेश होतो. सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हणून ओळखले जाते. जुलैमध्ये सूर्य कर्क राशी प्रवेश करणार आहे. सूर्याच्या कर्क राशीत गोचर करण्याने अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत. या गोचरने बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मी-नारायण राजयोगची निर्मिती होत आहे. या राजयोगाचा फायदा राशीचक्रातील काही राशींना होणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.

कर्क

सूर्याच्या गोचरने निर्माण होणाऱ्या लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोगाचा विशेष लाभ कर्क राशीच्या लोकांना मिळणार आहे. याकाळात तुम्हाला अनेक शुभ घटना घडलेल्या दिसून येतील. तुम्हाला नशिबाची पुरेपूर साथ लाभेल. या राजयोगात तुमचे नशीब पालटणारे अनुभव पाहायला मिळतील. विविध गोष्टींमधून धनलाभ होईल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. याकाळात एखादा नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी शुभ योग आहे. शिवाय व्यापाऱ्यांना गुंतवणुकीतून लाभ होईल. नवविवाहित जोडप्याला संतती सुख मिळण्याचा योग जुळून येत आहे. घरात आनंद आणि सुखसमृद्धी नांदेल.

तूळ

लक्ष्मी नारायण योगाच्या काळात तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात असलेल्या अडचणी आपोआप नाहीशा होतील. अडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक वाढेल. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. आर्थिक स्थिती सुधारल्याने मानसिक समाधान लाभेल. नोकरदार वर्गाला पगारवाढ आणि पदोन्नतीचा योग आहे. एखादे प्रकरण कोर्टात असेल तर तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल.

वृश्चिक

लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोगाचा फायदा वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा होणार आहे. याकाळात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडून येतील. नशिबाची पूर्ण साथ लाभल्याने प्रत्येक कार्यात यश मिळेल. मनासारख्या गोष्टी घडत असलयाने मन प्रसन्न राहील. करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. व्यवसाय विस्तारेल. आकस्मिक धनलाभ होईल. भौतिक सुविधा देणाऱ्या गोष्टींकडे कल राहील. घरामध्ये शुभ कार्य घडून येतील. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील.

WhatsApp channel
विभाग