Kumbh Rashi Horoscope 2025 : कुंभ राशीसाठी २०२५ हे वर्ष कसं असेल? जाणून घेऊया वार्षिक राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kumbh Rashi Horoscope 2025 : कुंभ राशीसाठी २०२५ हे वर्ष कसं असेल? जाणून घेऊया वार्षिक राशीभविष्य

Kumbh Rashi Horoscope 2025 : कुंभ राशीसाठी २०२५ हे वर्ष कसं असेल? जाणून घेऊया वार्षिक राशीभविष्य

HT Marathi Desk HT Marathi
Dec 18, 2024 04:55 PM IST

Kumbh Rashi Yearly Horoscope Prediction 2025 : कुंभ राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष खास असेल. पैसा-पाणी, करिअर, नोकरीधंदा, आरोग्य इत्यादींसाठी हे वर्ष कसं जाईल? जाणून घ्या कुंभ राशीचं वार्षिक राशीभविष्य.

Kumbh Rashi Horoscope 2025 : कुंभ राशीसाठी २०२५ हे वर्ष कसं असेल? जाणून घेऊया वार्षिक राशीभविष्य
Kumbh Rashi Horoscope 2025 : कुंभ राशीसाठी २०२५ हे वर्ष कसं असेल? जाणून घेऊया वार्षिक राशीभविष्य

aquarius horoscope 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार २०२५ हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक संधी घेऊन येणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना २०२५ मध्ये गुरू आणि शनीच्या संक्रमणामुळं मोठं यश मिळेल. मे २०२५ मध्ये कुंभ राशीचं भविष्य उज्ज्वल होण्याची शक्यता आहे, विशेषत: मे मध्ये गुरूच्या संक्रमणानंतर खूपच सकारात्मक वातावरण राहील.

शनीची साडेसाती

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीतील शनीची साडेसाती २४ जानेवारी २०२२ रोजी सुरू झाली आणि आता ती ३ जून २०२७ रोजी संपेल. शनीच्या साडेसातीच्या काळात आपल्या कृतींकडं लक्ष द्या, केवळ चांगली कर्मेच शनीच्या कोपापासून तुमचं रक्षण करू शकतील.

सुख समृद्धी

कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च २०२५ नंतर नवीन कार घेण्याचा योग आहे. जर तुम्ही प्लॉट किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. शुक्राच्या संक्रमणामुळं तुम्हाला फायदा होईल आणि कार किंवा घर घेण्याचं तुमचं स्वप्न या वर्षी पूर्ण होईल.

कुटुंब

२०२५ मध्ये कुटुंबात राहु केतूचा प्रभाव असेल आणि मतभेद होऊ शकतात. घरगुती जीवनात अडचणी येऊ शकतात. त्यामुळं या वर्षी इतरांच्या मतानं चालण्यापेक्षा चर्चेतून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. हे वर्ष कौटुंबिक जीवनासाठी तणावपूर्ण असू शकतं, म्हणून काळजीपूर्वक जगा. हे वर्ष लव्ह लाईफसाठीही संमिश्र म्हणता येईल.

आर्थिक पैलू

२०२५ च्या सुरुवातीला आर्थिक प्रगती होईल आणि मध्यात वेगानं प्रगती होईल. तथापि, आपण पैसे वाचवू शकणार नाही. मार्चमध्ये धनाच्या घरात राहुचे आगमन आणि पैशाच्या घरात शनीच्या प्रभावामुळे या वर्षी आर्थिक बाबींमध्ये तुमच्यासाठी फक्त सरासरी फळ मिळेल.

नोकरी

तुम्ही केलेल्या मेहनतीनुसार तुम्ही परिणाम साध्य करू शकाल. या वर्षी तुम्हाला तुमची बोलण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे जेणेकरून ऑफिसमधील संबंध सौहार्दपूर्ण राहतील. विशेषत: वरिष्ठांशी बोलताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरी बदलायची असेल तर वेळ सामान्य राहील. कोणतीही नवीन जबाबदारी घेताना तुमच्या क्षमतांचं मूल्यमापन अवश्य करा. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका.

व्यवसाय

जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी २०२५ सरासरीपेक्षा चांगला निकाल देईल. मे नंतर व्यवसायाचा विस्तार शक्य आहे. परदेशातील व्यवसायात अधिक लाभ होईल. बुध संक्रमण २०२४ पेक्षा २०२५ चांगले बनवू शकते. एकंदरीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.

शिक्षण

२०२५ हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट निकाल देऊ शकतं. मे नंतरचा काळ उच्च शिक्षणासाठी उत्तम राहील. इतरत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला राहील. कला आणि साहित्याशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी २०२५ हे वर्ष वरदान ठरणार आहे.

आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीनेही २०२५ हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी तापदायक वर्ष असू शकतं. राहू विशेषत: मे नंतर आरोग्याच्या समस्या घेऊन येईल. पोट किंवा मनाशी संबंधित समस्या असू शकतात. तथापि, मे नंतर तुमचं आरोग्य हळूहळू सुधारेल आणि जास्त काळजी करण्याची गरज नाही.

 

(डिस्क्लेमर: ही माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. ती संपूर्णपणे योग्य आहे असा आमचा दावा नाही. त्यामुळं यानुसार अंमलबजावणी करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) 

Whats_app_banner