Zodiac Signs and Career : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया कुंभ (Aquarius) राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.
कुंभ ही पुरुष प्रधान वायु तत्त्वाची स्थिर असलेली सामाजिक कल्याणाचा विचार करणारी शुद्र वर्णाची आणि अत्यंत बुध्दिमान अशी राशी आहे. या राशीचा स्वामी शनि आहे. आणि मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण राहूचे शततारका हे पूर्ण नक्षत्र आणि गुरुच्या पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचे तीन चरण यांनी कुंभ राशी त्यामुळे साहजिकच कुंभ राशीवर शनि ग्रहाबरोबर राहूचा खूप प्रभाव असून त्या खालोखाल गुरु आणि नंतर मंगळाचा प्रभाव दिसून येतो. या ग्रहांमुळे कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये सोशिकपणा याबरोबर चिकाटी गंभीर विचारसरणी बरोबर कमालीची बौध्दिक क्षमता दिसून येतो.
कुंभ राशीवर सर्वाधिक प्रभाव शनिचा दिसुन येत असल्याने निस्वार्थीपणा व ज्ञानाची परिपक्वता, मानवतेसाठी झटणारी अशी राशी आहे. बोलणे मोजकेच परंतु मुद्देसूद असते. अध्यात्म, वकीली, राजकारण, डॉक्टरी व्यवसाय, पोलीसखाते, न्यायखाते, मेडिकल स्टोअर्स इत्यादी व्यवसायात यश मिळते.
कुंभ राशींच्या लोकांमध्ये उत्कृष्ट बुद्धीमत्ता आणि अचाट स्मरणशक्ती असल्यामुळे या राशीची लोक हाती घेतलेल्या कामात यशस्वी होतात. यांचा जीवनविषयक दृष्टीकोन वेगळा असतो. खोलात जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि मुडी स्वभाव यामुळे यांच्यात वेगळेपण जाणवते वाढता. काळाच्या पुढचा विचार करणारे असतात. चिकित्सकपणाबरोबर दूरदृष्टी कल्पकता, भविष्याची चिंता आणि सतत नवनवीन संशोधन, नाविन्यपूर्ण विचारांची सांगड घालून विचारांमध्ये विधायक दृष्टीकोनातून सुधारणावादी संस्कृतीला चालना देण्याची प्रोत्साहक वृत्ती या गुणांमुळे कुंभ राशीचा मित्रपरिवार आणि चाहता वर्ग मोठा असतो. सतत सामाजिक जीवनात मिसळल्याने लोकसंग्रह मोठा असतो.
तसेच, स्वभावाने या राशीच्या व्यक्ती गंभीर वाटत असल्यातरी विद्वान, प्रगल्भ बुध्दीच्या, चौकस, चिकित्सक, संशोधक, वृत्तीच्या दिसून येतात. गुढ विचार आणि संशोधक प्रवृत्ती म्हणूनच कुंभ राशीची ओळख आहे. शारिरीक कष्ट घेण्याची तयारी वैराग्य त्याग व समाजाभिमुख वृत्ती या गुणांचा समावेश कुंभ राशीत दिसून येतो.
कुंभ राशीच्या व्यक्ती प्रामुख्याने बौद्धिक क्षेत्रात रममाण होताना दिसतात. प्राध्यापक, शिक्षक, शिक्षणतज्ञ या पदांवर प्रामुख्याने याच व्यक्ती आढळून येतात. वैचारिक लेखन करणारा विद्वान, ज्ञानपिपासू, प्रगल्भ बुद्धिचा, लेखक, संतवाङमयाचे किंवा पौराणिक विषयांचे गाढे अभ्यासक, समाजाला नव्या विचारांची दिशा देणाऱ्या व्यक्ती म्हणून कुंभ राशीच्या व्यक्तीच आघाडीवर दिसून येतात. अधिकाराच्या पदावर तसेच संशोधक, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, पत्रकारिता आदि क्षेत्रात कुंभ व्यक्तीचे वर्चस्व दिसून येते.
कुंभ राशीवर शनि आणि मंगळाचा प्रभाव असल्यामुळे बांधकाम क्षेत्रात तसेच खाण उद्योग यातही आढळतात. कुंभ राशीत गुरुचे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असल्यामुळे बँकींग क्षेत्र, फायनान्स कंपन्या, विमा कंपन्या, हाऊसीग फायनान्स या क्षेत्रात सुध्दा आपले करीअर करतात. शिक्षण क्षेत्रात तर प्रामुख्याने कुंभ व्यक्तींचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पेट्रोलपंप, तेल उद्योग, तेल संशोधक, कोळसा उद्योग, खाद्यतेल उद्योग, शेती उद्योग या क्षेत्रात सुध्दा कुंभ व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते. इमारतींची निर्मिती उद्योग या क्षेत्रात सुध्दा कुंभ व्यक्ती आपले करीअर करतांना दिसून येतात. या क्षेत्रात व्यवसाय किंवा नोकरी करतांना सुध्दा कुंभ व्यक्तींचे प्राबल्य दिसून येते.
कुंभ राशीच्या कर्मस्थानी वृश्चिक राशी असून तिचा स्वामी मंगळ हा भूमीचा स्वामी आहे. या योगामुळे कुंभ व्यक्ती जमिनीसंबंधीत क्षेत्रात आपले करीअर करतांना दिसतात. विशेषतः बांधकाम क्षेत्र, जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार तसेच या क्षेत्राबरोबर संरक्षण क्षेत्र, पोलीसदल, सिक्युरिटी एजन्सी या क्षेत्रातसुध्दा कुंभ व्यक्तींना चांगले करीअर करण्याची संधी मिळू शकते. विशेषतः या व्यक्ती स्वतंत्रपणे व्यवसाय करतांना दिसून येतात. क्वचित नोकरीत अधिकारपदावर कार्य करतांना आढळतात.
कुंभ राशीवर शनि आणि राहू त्याचबरोबर गुरु या ग्रहांचा प्रभाव असल्याने दिसून येत असल्यामुळे सामाजिक संस्था, समाज कारण आणि राजकारण किंवा फायनान्स कंपनीत सचिव, अध्यक्ष अशी पदे भूषविताना कुंभ व्यक्ती दिसून येतात. नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची यांची रुची दिसून येते. अथक परिश्रम करण्याची तयारी असल्याने व्यवसाय आणि नोकरी या दोन्हीं मध्ये कुंभ राशीच्या व्यक्ती वर उल्लेख केलेल्या संभाव्य क्षेत्रात यशस्वी होताना दिसुन येतात.
संबंधित बातम्या