Janmashtami 2024 : राशीनुसार श्रीकृष्णाला अर्पण करा ‘या’ गोष्टी; जीवनात मिळेल भरपूर यश! जाणून घ्या...
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Janmashtami 2024 : राशीनुसार श्रीकृष्णाला अर्पण करा ‘या’ गोष्टी; जीवनात मिळेल भरपूर यश! जाणून घ्या...

Janmashtami 2024 : राशीनुसार श्रीकृष्णाला अर्पण करा ‘या’ गोष्टी; जीवनात मिळेल भरपूर यश! जाणून घ्या...

Aug 23, 2024 01:10 PM IST

Krishna Janmashtami 2024: यावर्षी २६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी श्रीकृष्णाचा विशेष आशीर्वाद मिळण्यासाठी त्याला प्रिय वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते.

Krishna Janmashtami 2024:राशीनुसार श्रीकृष्णाला अर्पण करा ‘या’ गोष्टी
Krishna Janmashtami 2024:राशीनुसार श्रीकृष्णाला अर्पण करा ‘या’ गोष्टी

Krishna Janmashtami 2024 : भगवान कृष्ण हा विष्णू देवाचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगात धर्म स्थापनेसाठी झाला होता. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावर्षी २६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी श्रीकृष्णाचा विशेष आशीर्वाद मिळण्यासाठी त्याला प्रिय वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. जे लोक आपल्या राशीनुसार, देवाला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण करतात, त्यांना निश्चितच चांगले फळ मिळते. चला जाणून घेऊया श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याचे विशेष उपाय...

मेष

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला लाल वस्त्र, कुंकुम आणि लोणी-मिश्री अर्पण करणे शुभ मानले जाते.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला चांदीच्या दागिन्यांनी सजवले, तर त्यांना देवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. याशिवाय पांढरे वस्त्र, लोणी आणि पांढरे चंदन अर्पण करणे देखील शुभ आहे.

मिथुन

या राशीच्या लोकांसाठी श्रीकृष्णाला पिवळे कपडे, पिवळे चंदन आणि दही अर्पण करणे शुभ मानले जाते.

कर्क

कर्क राशीचे लोक श्रीकृष्णाला पांढरे वस्त्र, दूध आणि केशर अर्पण करू शकतात.

सिंह

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाला गुलाबी वस्त्रे, अष्टगंध चंदन आणि लोणी आणि साखर लोणी अर्पण करणे शुभ मानले जाते.

कन्या

कन्या राशीचे लोक भगवान श्रीकृष्णाला हिरवे कपडे आणि खव्याची बर्फी अर्पण करू शकतात.

Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जयंतीला राशीनुसार बाळकृष्णाचा असा करा श्रृंगार, जीवनाततील संकट होईल दूर

तूळ

या राशीच्या लोकांसाठी कृष्णाजींना भगव्या रंगाचे कपडे अर्पण करावेत. तसेच, श्रीकृष्णाला तूप आणि लोणी-मिश्री अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.

वृश्चिक

जन्माष्टमीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला लाल वस्त्र, खव्याची मिठाई आणि दही अर्पण केल्यास त्यांना देवाचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो.

धनु

धनु राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचे कपडे आणि पिवळी मिठाई भगवान श्रीकृष्णाला अर्पण करावी, ते शुभ असते.

मकर

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी बाळकृष्णाला केशरी रंगाचे कपडे आणि साखरेची मिठाई अर्पण करणे शुभ असते.

कुंभ

कुंभ राशीचे लोक भगवान श्रीकृष्णाला निळ्या रंगाचे कपडे आणि बालूशाही अर्पण करू शकतात.

मीन

ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला पितांबरी रंगाचे कपडे आणि खव्याची बर्फी अर्पण करणे चांगले मानले जाते.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner