Kharmas Month: यावर्षी खरमास महिना १५ डिसेंबरपासून सुरू होत असून १५ जानेवारीला संपतो. या काळात विवाह, साखरपुडा, यज्ञ, गृहस्थता इत्यादी शुभ कामे केली जाणार नाहीत. धार्मिक मान्यतेनुसार वर्षभरात दोन प्रसंग येतात जेव्हा खरमास जाणवतो. एक खरमास मार्चच्या मध्यापासून एप्रिलच्या मध्यापर्यंत आणि दुसरा खारमास डिसेंबरच्या मध्यापासून जानेवारीच्या मध्यापर्यंत येतो. ज्योतिषीय गणनेनुसार खरमास महिन्यात काही राशींवर सर्व ग्रहांची विशेष कृपा राहील. ग्रहनक्षत्रांच्या बदलाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. ज्योतिषशास्त्रात नमूद केलेल्या सर्व १२ राशींवर याचा प्रभाव दिसून येतो. जाणून घेऊया, खरमासदरम्यान कोणत्या राशींना मिळणार शुभ फळ.
मेष राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल.
प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
उत्पन्नात वाढ होऊ शकते.
तुमच्या कामाचे कौतुक होईल.
सर्व कामांमध्ये यश मिळेल.
नोकरी आणि व्यवसायासाठी उत्तम काळ आहे.
मिथुन राशीच्या जातकांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
मान-सन्मानात वाढ होऊ शकते.
वाहन खरेदी करू शकता.
आर्थिक स्थिती सुधारेल.
कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.
व्यवहार फायदेशीर ठरतील.
उत्पन्नवाढीमुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
जोडीदारासोबत वेळ घालवाल, ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखी राहील.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही.
या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक राशीच्या जातकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल.
या काळात तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकाल.
व्यापाऱ्यांना नफा होऊ शकतो.
धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ शुभ म्हणता येईल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
संबंधित बातम्या