वैदिक शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यानुसार ते ग्रह बाराही राशींवर प्रभाव टाकत असतात. ग्रहांच्या गुणधर्मांचा थेट प्रभाव राशींवर पडत असतो. त्यामुळेच राशींचे भविष्य ठरत असते. ज्योतिषशास्त्रात कार्यरत असणाऱ्या नऊ ग्रहांमध्ये केतू ग्रहाचा देखील समावेश होतो. केतू ग्रहाला छाया ग्रह असेही संबोधले जाते. केतूसुद्धा एका ठराविक वेळेत राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. प्रत्येक ग्रहांच्या स्थान बदलाचा एक निश्चित कालावधी असतो.
त्यानुसार केतू येत्या ८ सप्टेंबर २०२४ रोजी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. केतू हस्त नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातून निघून दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी केतू हस्त नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. केतूच्या या भ्रमणाचा लाभ राशीचक्रातील काही राशींना मिळणार आहे. नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ अशा विविध फलदायी घटना या राशींसाठी घडणार आहेत. पाहूया त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.
केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ मेष राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. याकाळात तुमच्यात साहसीवृत्ती आणि संयमात वाढ होईल. कोणत्याही गोष्टीत आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. याकाळात नोकरदार वर्गाला कार्यात वेगाने प्रगती झालेली जाणवेल. शिवाय पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्यासाठी कमाईचे विविध मार्ग खुले होतील. आर्थिक आवक वाढल्याने उत्पन्नात वाढ होईल. वाहन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा योग जुळून येत आहे. विवाहित लोकांच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदेल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. त्यामुळे मन उत्साही राहील. तुमच्या मनात असलेल्या सर्व गोष्टी याकाळात पूर्णत्वास जातील.
केतू ग्रहाच्या हस्त नक्षत्रात होणाऱ्या भ्रमणचा फायदा वृषभ राशीलासुद्धा होणार आहे. याकाळात तुमच्या कमाईत प्रचंड वाढ होईल. शिवाय मिळकतीचे नवे मार्ग सापडतील. नोकरदार वर्गाला कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मर्जी प्राप्त होईल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होऊन नावलौकिक वाढेल. त्यामुळे तुमच्या करिअरच्या आलेख वेगाने उंचावेल. पैशांची आवक चांगली असल्याने भविष्याच्या दृष्टिकोनातून बचत करण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. त्यामुळे समाजात मानसन्मान वाढून प्रतिष्ठा लाभेल. शिवाय नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळू शकते.
छाया ग्रह केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा शुभ लाभ मकर राशीच्या लोकांनाही मिळणार आहे. याकाळात तुम्हाला सतत अनपेक्षित धनलाभाचे प्रसंग घडतील. हातात पैसे आल्याने मानसिक समाधान लाभेल. तुमच्यातील धाडशी आणि धडाडीपणा वाढेल. व्यवसायिकांना व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होईल. याकाळात कोणत्याही क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीतून विशेष फायदा होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. हा काळ स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी चांगला असणार आहे. अनेक सुखद घटना कानावर पडतील.
संबंधित बातम्या