प्रत्येक ग्रहाचे आपल्या कालगणनेनुसार राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ग्रहांचे हे गोचर राशीचक्रातील १२ राशींवर प्रभावी ठरते, काही राशींसाठी हे गोचर शुभ ठरते तर काही राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरते. राशींवर होणारा चांगला आणि वाईट परिणाम त्या ग्रहाच्या पुढील परिवर्तनापर्यंत राहतो. नवग्रह सूर्य, चंद्र, बुध, गुरु, मंगळ, शुक्र, शनि, राहू, केतू या ग्रहांचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव संपूर्ण जगावरही होतो.
केतू हा मंगळाप्रमाणेच स्वभावाने क्रूर ग्रह आहे आणि केतू देखील मंगळ ज्या गोष्टींचा कारक आहे त्याचेच प्रतिनिधित्व करतो. हा ग्रह अश्विनी, मघा आणि मूल नक्षत्र या तीन नक्षत्रांचा स्वामी आहे. जन्मपत्रिकेत राहुसोबत केतू हा कालसर्प योगाची स्थिती निर्माण करतो.
केतूचे नक्षत्र बदलल्याने सर्व १२ राशींवर सकारात्मक-नकारात्मक परिणाम होतो. केतूचा नक्षत्र बदल विशेष मानला जातो. केतू सध्या कन्या राशीत विराजमान असून, उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात भ्रमण करीत आहे. रविवार १० नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ३१ मिनिटांनी केतूने या नक्षत्रात प्रवेश केला. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी सूर्यदेव आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार केतू या वर्षाच्या अखेरपर्यंत सूर्याच्या नक्षत्रात राहील. अशापरिस्थितीत सूर्याच्या नक्षत्रात केतूच्या संक्रमणाचा फायदा कोणत्या राशींना होऊ शकतो हे जाणून घेऊया-
धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या नक्षत्रात केतूचे संक्रमण शुभ मानले जाते. कुटुंब आणि पित्रांचे आशीर्वाद मिळतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक समस्यांमध्ये फायदा होईल. पैशांशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होऊ लागतील.
सूर्याच्या नक्षत्रातील केतूचा हा नक्षत्र बदल मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक मानला जातो. वर्षानुवर्षे रखडलेली तुमची कामे पूर्ण होऊ शकतील. तसेच संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आईच्या तब्येतीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी काळ शुभ मानला जात आहे.
सूर्याच्या नक्षत्रात केतूच्या संक्रमणाचा फायदा होऊ शकतो. वादविवादात विजय मिळवू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. प्रॉपर्टीमध्ये केलेली कोणतीही जुनी गुंतवणूक तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकते. कामाच्या अनुषंगाने प्रवास करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.).