Ketu Gochar: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण म्हणजेच गोचर करत असतो. सुमारे १८ महिन्यांनंतर छाया ग्रह केतू १८ मे २०२५ रोजी दुपारी ०४ वाजून ३० मिनिटांनी सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. केतूचे सिंह राशीचे संक्रमण किंवा गोचर अनेक राशींसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या भाग्यशाली राशींना व्यवसाय, नोकरी आणि फायनान्समध्ये चांगले परिणाम मिळतील. या बरोबरच इतरही अनेक लाभ मिळतील. ज्या राशींना या गोचराचे लाभ मिळणार आहेत, त्या राशी आहेत वृषभ, धनु, तूळ. जाणून घेऊ या, केतूचे सिंह राशीतील होणाऱ्या गोचरामुळे या तीन भाग्यवान राशींना नेमके कोणते लाभ मिळणार आहेत.
वृषभ राशीच्या जातकांसाठी केतूची राशी लाभदायक ठरेल. वृषभ राशीच्या जातकांना नोकरीत पदोन्नती मिळणार आहे. या बरोबरच या राशीच्या जातकांच्या उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते. तसेच या जातकांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. या गोचर स्थितीमुळे या जातकांना जमीन, इमारत आणि वाहन खरेदी शक्य आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. पैशांची आवक वाढेल.
केतूच्या सिंहाचे संक्रमण किंवा गोचर धनु राशीच्या लोकांना शुभ फळ देणारे ठरणार आहे. केतू संक्रमणाच्या प्रभावाने धनु राशीच्या जातकांना नशिबाची साथ मिळणार आहे. सुदैवाने काही कामे होतील. कामाच्या ठिकाणी आपले कौशल्य दाखविण्याची संधी या राशीच्या जातकांना मिळणार आहे. या जातकांना नोकरीत नवीन जबाबदारी किंवा भूमिका मिळू शकते. या बरोबरच पगारात वाढ होऊ शकते.
तूळ राशीच्या जातकांसाठी केतूचे हे संक्रमण किंवा गोचर शुभ असणार आहे. या गोचरामुळे तूळ राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. तूळ राशीच्या जातकांची आर्थिकदृष्ट्या भरभराट होणार आहे. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. आकर्षणाची केंद्रे असतील. शुभतेची चिन्हे राहतील. ज्याची गरज असेल, अशी गोष्ट या जातकांना आयुष्यात उपलब्ध होईल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या