Ketu Gochar 2025 In Marathi : लवकरच नवीन वर्ष सुरू होईल. नवीन वर्षातही अनेक ग्रह राशी गोचर करतील आणि राशीचक्रातील सर्व राशीवर त्याचा शुभ किंवा अशुभ परिणाम होईल. प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र बदल करतो.
केतू सध्या कन्या राशीत आहे. मे २०२५ मध्येच कन्या राशीच्या व्यक्तींची केतूच्या वाईट परिणामा पासून सुटका होईल. केतू कोणत्याही राशीचा स्वामी नसला तरी आपल्या कुंडलीतील प्रत्येक घरात तो वेगवेगळे परिणाम देतो. केतूच्या प्रत्येक घराची फळे आणि त्याचे त्रास आणि फायदे वेगवेगळे असतात. पंचांगानुसार केतू १८ मे २०२५, रविवारी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सिंह राशीत संक्रमण करेल. २९ मे २०२५, गुरुवारी रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी सिंह राशीत केतूचे संक्रमण होत आहे. केतूची राशी बदलल्याने कन्या राशीच्या लोकांना अनेक प्रकारे दिलासा मिळेल, परंतु सिंह राशीच्या लोकांवर केतूचा अंतर्दाशेचा वाईट परिणाम सुरू होईल. केतूमुळे सिंह राशीच्या लोकांना सांधेदुखी, नोकरी, मुले इ. समस्या निर्माण होतील, परंतु कुंडलीच्या घरानुसार केतूचा परिणाम प्रत्येक राशीवर वेग-वेगळा असेल.
केतू वाईट असेल तर काय होते,
केतू तुमच्या राशीवर कोणता प्रभाव दाखवेल, यासाठी तुम्ही तुमच्या कुंडलीत केतू कोणत्या घरात बसलेला आहे हे पाहावे लागेल. केतूच्या प्रत्येक घराचे वेगवेगळे परिणाम आहेत. असे म्हटले जाते की जर तुमच्या कुंडलीत केतू खराब असेल तर तुम्हाला तुमचे प्रेम आणि आईचे प्रेम म्हणजेच काका, मामा मिळत नाहीत. जर तुम्हाला केतू किंवा केतूची महादशा चांगला परिणाम देत नसेल तर तुम्हाला त्वचारोग, सांधेदुखी, वेगाने केस गळणे, शरीराच्या मज्जातंतूंमध्ये कमकुवतपणा यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. याशिवाय संतती होण्यातही अडचणी येऊ शकतात.
केतूला चांगलं करण्यासाठी काय करावं
कुणाला वाईट बोलून केतूही वाईट परिणाम करत असतो. त्यामुळे केतूच्या जाचातून सुटका करण्यासाठी कधीही कुणाला वाईट बोलू नका. ज्या लोकांच्या लग्नस्थानी केतू असतो त्यांना डोक्याशी संबंधित समस्या असतात. हे लोक जिद्दी असतात, ज्याचा तुमच्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होते. त्यामुळे हट्टी होऊ नका. देवाचे जास्तीत नामस्मरण करा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)