Vastu Tips For Buddha Idol : घराच्या सजावटीसाठी लोक आपल्या घरात भगवान बुद्धाची मूर्ती ठेवतात. वास्तूनुसार ही मूर्ती घराचे सौंदर्य वाढवते आणि घरात सुख-समृद्धीही आणते. बुद्धाच्या मूर्तीमुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात, असे मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार, घरात ठेवण्यात आलेल्या बुद्धमूर्तीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद घडतो. तसेच घरास शांतता देखील नांदते. परंतु, घरात चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी बुद्धाची मूर्ती स्थापित केल्यास जीवनात समस्या देखीव उद्भवू शकतात. चला जाणून घेऊ या घराच्या सुखासाठी, समृद्धीसाठी बुद्धाची मूर्ती ठेवण्यासाठी वास्तुचे नियम काय आहेत...
आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आशीर्वाद मुद्रेमध्ये बुद्धाची मूर्ती स्थापित करणे शुभ मानले गेले आहे.
भगवान बुद्धांची मूर्ती जमिनीवर ठेवायला विसरू नका. नेहमी जमिनीपासून ३-४ फूट उंचीवर ठेवा. असे म्हणतात की यामुळे शत्रूंपासून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद येतो.
घराच्या पश्चिम दिशेला उजव्या बाजूला झुकलेली भगवान बुद्धांची मूर्ती ठेवणे अत्यंत लाभदायक मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-शांती मिळते.
वास्तूनुसार आपल्या घराच्या मंदिरात भगवान बुद्धांची मूर्ती पूर्व दिशेला ठेवण्यात यावी. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनःशांती मिळते, अशी मान्यता आहे.
मुलांच्या अभ्यासिकेत भगवान बुद्धांची मूर्ती पूर्वाभिमुख ठेवता येते. असे मानले जाते की पूर्वाभिमुख ठेवलेल्या बुद्धमूर्तीमुळ मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होते.
वास्तुनुसार डायनिंग हॉल किंवा दिवाणखान्यात हात जोडलेली बुद्धाची मूर्ती ठेवावी. असे मानले जाते की प्रार्थना करताना बुद्धाची मूर्ती स्थापित केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या