Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज चंद्र दिवस रात्र मंगळाच्या वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. आजच्या दिवसावर बुध ग्रहाचाही प्रभाव राहील. अशात कर्क,सिंह व कन्या राशीच्या लोकांना दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!
आज अनिष्ट चंद्रभ्रमणात एखादा निर्णय घेताना स्वतःच संभ्रमात पडाल. नको त्या गोष्टींवर खल करत बसाल आणि हातात मात्र काहीच पडणार नाही. करियरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. यंत्रावर काम करणारांनी अवश्य काळजी घ्यावी. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल.आपणास काहीस त्रासदायक ठरणार आहे. महत्वाच्या कामाबाबतीत जपून निर्णय घ्या. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. यामुळे ताणतणाव पूर्ण सुरुवात होईल. आळसीवृत्ती टाळावी. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्ती मध्ये नविन समस्या उद्भवतील. अचानक संकट येण्याची संभावना आहे. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत. तुम्हाला वादामधुन नुकसान सहन करावे लागेल. कामे पुर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०३, ०४.
आज चंद्रबल अनुकूल असल्याने नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीमुळे आर्थिक लाभ चांगले होतील. अडथळ्याच्या शर्यतीतून का होईना पण पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील. घरातील हलक्या फुलक्या वातावरणामुळे सुखावून जाल. करियरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल. नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहिल. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपुन घ्यावा. नवीन योजनेत वाढ विस्तार करण्यासाठी अनुकुल दिवस आहे.
शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०१, ०५.
आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात भावनांची थोडीशी ओढाताण झाल्यामुळे मनाला ताण जाणवेल. संतती कडून अपेक्षाभंग होऊ शकतो. मुलांच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ ठेवावा लागेल. स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर कष्ट राखून घ्यावे लागतील. व्यसनांपासून सावध रहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या. छोट्याशा कारणाने मनशांती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवती पेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवा. आळश झटकुन कामाला लागा. शारिरिक आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढेल. मोठी शस्त्रक्रिया अपधात भय संभवते.
शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.