मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क राशीच्या लोकांचे आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल, वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क राशीच्या लोकांचे आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल, वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 08, 2024 09:54 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 8 february 2024 : आज ८ फेब्रुवारी २०२४ गुरुवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य.

Kark Sinh Kanya Rashi
Kark Sinh Kanya Rashi

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज गुरुवारच्या दिनमानावर बुधादित्य व लक्ष्मीयोगाचा प्रभाव राहणार आहे. कसा राहील कर्क, सिंह व कन्या राशीसाठी आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

कर्कः 

आज चंद्रबल उत्तम असल्याने अत्यंत शुभ दिनमान असेल. नोकरी व्यवसायात नवीन क्षितीजे साद घालतील. परंतु त्याचा खोलवर अभ्यास करणे हिताचे ठरेल. दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये.  ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जादा काम करावे लागेल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०१, ०८.

सिंह: 

आज प्रतिकूल वातावरण राहील. मनामध्ये मात्र प्रचंड खळबळ असा अनुभव येईल. जवळच्या मित्राच्या भरवशावर रहाल परंतु त्यापासून लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्येतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. काहींना परदेशात प्रवास घडुन येतील. स्वभावानुसार मानसिक चिडचिड दगदग होईल. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. वाईट संगत अंगलट येईल. मानसिक क्लेशातून त्रासातुन जावे लागणार आहे. अनैतिक कामापासुन दूर रहा अन्यथा कायद्याच्या कचाट्यात अडकाल.

शुभरंग: लाल, शुभदिशा पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्या: 

आज शनि आणि गुरूचं स्वामित्व असणाऱ्या राशीतुन चंद्रभ्रमण होत आहे. आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल आत्मविश्वास उंचावलेला असेल. कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. अन्यथा स्वताचे नुकसान करून घ्याल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.