मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांना परदेश भ्रमणाचे योग, वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांना परदेश भ्रमणाचे योग, वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 07, 2024 10:35 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 7 february 2024 : आज ७ फेब्रुवारी २०२४ बुधवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य.

Kark Sinh Kanya
Kark Sinh Kanya

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज बुधवारच्या दिनमानावर शुक्राचा विशेष प्रभाव राहणार आहे, कसा राहील कर्क, सिंह व कन्या राशीसाठी आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

कर्कः 

आज शुक्राशी होणारा योग पाहता आपणास शुभअशुभ अशी समिश्र स्वरुपाची फळे मिळतील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. कमाईमध्ये ही वाढ होण्याचे योग बनतील. तुमची स्थिती उत्तम होईल. प्रयत्न करून आणि आपल्या धैर्याच्या प्रति सजग राहण्याची आवश्यकता आहे. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. अनिष्ट चंद्रभ्रमणात मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०७.

सिंह: 

आज शुक्र-चंद्र योग आपणास आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. थोराचे निर्णय लाभदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे.प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील.पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता कर्मस्थ मंगळामुळे पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्याः 

आज चंद्रबल उत्तम असल्याने अंत्यत शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांनी कौटुंबिक जीवनात आणि समृद्धी आणेल. मेहनत आणि कुठल्या ही कार्याच्या प्रति तुमचा कल पाहून आपल्या उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०१, ०४.