मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क राशीच्या लोकांना मानसिक त्रास होईल ! पाहा तिन्ही राशींचे भविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क राशीच्या लोकांना मानसिक त्रास होईल ! पाहा तिन्ही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 06, 2024 09:55 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 6 january 2024: शनिवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य

kark sinh kanya rashi
kark sinh kanya rashi

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज चंद्र राहुच्या नक्षत्रातुन गोचर करणार असून, हर्षलशी प्रतियोग करीत आहे. वणिज करणात राशींना फायदा होईल की नुकसान, वाचा राशीभविष्य!

कर्क: 

आज प्रतिकूल वातावरण राहिल.मनामध्ये मात्र प्रचंड खळबळ असा अनुभव येईल. जवळच्या मित्राच्या भरवशावर रहाल परंतु त्यापासून लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. काहींना परदेशात प्रवास घडुन येतील. स्वभावानुसार मानसिक चिडचिड दगदग होईल. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. वाईट संगत अंगलट येईल.मानसिक क्लेशातून त्रासातुन जावे लागणार आहे. अनैतिक कामापासुन दुर रहा अन्यथा कायद्याच्या कचाट्यात अडकाल. प्रकृतीकडे लक्ष दयावे.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०१, ०५.

सिंह: 

आज राहुचं स्वामित्व असणाऱ्या नक्षत्रातुन लाभ चंद्रभ्रमण होत आहे. आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल आत्मविश्वास उंचावलेला असेल. कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. अन्यथा स्वताचे नुकसान करून घ्याल. मित्रमैत्रिण नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. अचानक धनलाभाची संधी मिळेल.

शुभरंग: लाल, शुभदिशा पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्याः 

आज चंद्रोचरात चंचल स्वभावाला थोडा आळा घालावा लागेल. धडाडीने एखादे काम पूर्ण करणे या गोष्टी संभवतात. शैक्षणिक क्षेत्रात संशोधनही चांगल्या प्रकारे करू शकता. अभ्यासात प्रगती करून घेता येईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नविन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. घाईगडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.