Kark Sinh Kanya Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा, वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य-kark sinh kanya rashi prediction today 6 february 2024 cancer leo virgo zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा, वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा, वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Feb 06, 2024 10:51 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 6 february 2024 : आज ६ फेब्रुवारी २०२४ मंगळवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य.

Cancer, Leo, Virgo
Cancer, Leo, Virgo

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज मंगळवार रोजी, चंद्रदेव गुरू हर्षलशी षडाष्टक योग करीत असुन, कसा राहील कर्क, सिंह व कन्या राशीसाठी आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

कर्क: 

आज चंद्रबल उत्तम राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे. त्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपणास आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. परमेश्वरावर विशेष आस्था निर्माण होईल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. लेखन प्रकाशित होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०६.

सिंहः 

आज अनिष्ट चंद्रभ्रमणामुळे आपल्या स्वभावात चंचलता निर्माण होईल. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. व्यवसायात भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड जाईल. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होतील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल. व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. व्यापार व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. व्यवहार करताना जपून करावेत. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०४, ०७.

कन्या: 

आज गुरू हर्षल षडाष्टक योगात व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामाचा दर्जा सुधारेल. समाजकारणाची आवड असल्यामुळे जन मानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम रहाणार आहात. कामाचीगती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदाराचे नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०५, ०९.

Whats_app_banner